मुबंई: ( Bengal Association to BCCI on Ban Harsha Bhogle ) भारतीय क्रिकेट समलोचक हर्षा भोगले यांच्यावर 'बंगाल क्रिकेट असोसिएशने' आयपीएल मॅच दरम्यान समालोचन करण्यास बंदी घातली आहे. 'बीसीसीआय'ला पत्र पाठवत 'बंगाल क्रिकेट असोसिएश'ने ही मागणी केली आहे.
काय आहे कारण?
आयपीएल सामन्याच्या दरम्यान हर्षा भोगले आणि सायमन डूल यांनी कोलकत्तास्थित इडन गार्डन्स आणि पिच क्यूरेटर सुजान मुखर्जी यांच्यावर वक्ततव्य केलं होतं. कोलकाताच्या क्युरेटरची ''केकेआरला खेळण्यासाठी हवं तसं पिच द्यायची तयारी नसेल तर केकेआरचे सामने इडन गार्डन्स व कोलकत्ताच्या ऐवजी अन्य ठिकाणी खेळावावेत.'' असं वक्तव्य केल होतं.याच वक्तव्यावर 'बंगाल क्रिकेट असोसिएश'ने आक्षेप नोंदवला आहे.
यापूर्वी 'केकेआर'ने स्पिन विकेट नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 'केकेआर'चा कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही 'इडन गार्डन'ची मैदानचे पिच स्पिनर्सला मदत करणारे हवे अशी आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यावर आम्ही बीसीसीआयच्या नियमावली प्रमाणे पिच तयार करतो असे उत्तर इडन गार्डन्सचे पिच क्यूरेटर सुजान मुखर्जी यांनी दिले होते. दरम्यान हर्षा भोगले आणि सायमन डूल यांच्या वक्तव्यांच्या वादावर बीसीसीआय आता या प्रकरणात काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यंदाची आयपीएल २०२५ हंगाम ची फायनल देखील कोलकातामध्येच होणार आहे.