परिवर्तन’ करणार महापौरपदाची वाट सुकर

    22-Apr-2025
Total Views |


BJP mandal adhyksha in dombivali
 
डोंबिवली: (BJP for KDMC Election) भाजपने एकाच दिवशी संपूर्ण राज्यभरात मंडल अध्यक्षांची निवड केली. पक्षाने केलेल्या नवीन रचनेनुसार आता मंडलाची संख्या वाढली आहे. ‘१०० बूथसाठी एक मंडल, एक अध्यक्ष,’ अशी निवड केली आहे. भाजपचे ध्येय ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ हे आहे. नवीन रचनेनुसार भाजपचे बूथ आणखीन मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला होणार आहे. एकूणच भाजपमधील हे परिवर्तन पाहता महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
भाजपने संपूर्ण राज्यभरात १ हजार, २०० मंडल अध्यक्षांची निवड केली आहे. ही संख्या पूर्वी ७५० होती. परिसराची भौगोलिक रचना, महापालिकेची सीमारेषा, विधानसभेची सीमारेषा, या सर्वांचा अभ्यास करून ही मंडल रचना केली जाते.
कल्याण जिल्ह्यात आधी नऊ मंडल संख्या होती. आता ही संख्या वाढून २० मंडल झाली आहे. एखाद्या मंडलात २५० बूथ असतील, तर एका व्यक्तीला सर्वत्र धावावे लागत होते. पूर्वी कल्याण जिल्ह्यात ५४० पदाधिकारी काम करीत होते. त्याऐवजी आता १ हजार, २०० पदाधिकारी काम करतील. यामुळे जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. परिणामी, बूथ मजबूत हे ध्येय साध्य होईल.
 
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदा विजयाची हॅट्ट्रिक मारली. केलेल्या विकासकामांच्या जोरावर पाच लाख मताधिक्याने आपण निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना २ लाख, ९ हजार, १४४ मताधिक्य मिळाले.
 
लोकसभा निवडणुकीत ८० हजारांहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती. त्याचा फटका खा. डॉ. शिंदे यांना बसला. लोकसभा निवडणुकीचा कित्ता पुन्हा गिरविला जाऊ नये, याकरिता विधानसभा निवडणुकीत आ. रविंद्र चव्हाण यांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन मतदारांमध्ये जागरूकता निर्माण केली. प्रत्येक मतदारांचे नाव मतदार यादीत आहे की, नाही याची शहानिशा केली. मतदारांना बूथ शोधण्यासाठी त्रास होऊ नये, याचीही काळजी घेतली होती.
 
भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ‘ग्राऊंड लेव्हल’ला उतरून काम करीत होते. आता महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. पालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर बसवणार, अशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानुसार पक्षाने केलेले परिवर्तन आणि बूथ मजबुतीकरण यात भाजपचा महापौरपदाचा मार्ग सुकर होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
 
आता प्रतीक्षा जिल्हाध्यक्षपदाची 
 
पक्षाचे संघटन पर्व आता तीन वर्षांसाठी राहणार आहे. भाजपच्या रचनेनुसार संघटन पर्व हे सदस्य नोंदणीपासून सुरू होते. यापूर्वी संघटन पर्व २०१४-१५ मध्ये राबविण्यात आले होते. त्यानंतर २०१८ साली सदस्य नोंदणी झाली, पण ती पूर्ण झाली नव्हती. पक्षाने आता आधी ही नोंदणी पूर्ण केली. सहा वर्षांतून एकदा संघटन पर्व राबविण्यात येते. मात्र, तीन वर्षांनी पदे बदलली जातील. सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा घेऊन पद बदल केला जातो. यामध्ये सदस्य नोंदणी, सक्रियता अर्ज, बूथ अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांची निवड केली जाते. त्यानंतर समिती बनविली जाते. मंडल अध्यक्ष निवडीनंतर आता जिल्ह्याला नवीन अध्यक्ष कोण मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
  
अग्रलेख
जरुर वाचा
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी!

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी!

लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यातर्फे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने अधिकृत घोषणा करण्यात आली. “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून, हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121