जगात केवळ व्हेल या सागरी सस्तन प्राण्याच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यांपैकी अरबी समुद्रात आढळणारी ‘हम्पबॅक व्हेल’ची प्रजात ही अरबी समुद्रासाठी प्रदेशनिष्ठ. जगात ही प्रजात केवळ अरबी समुद्रामध्ये अधिवास करते. जाणून घेऊया या प्रजातीविषयी...
'टूथड व्हेल’ आणि ‘बलिन व्हेल’ हे व्हेलचे प्रामुख्याने दोन गट आहेत. यामधील ‘हम्पबॅक व्हेल’ (Megaptera novaeangliae) हा ‘बलिन व्हेल’ या प्रकारात मोडतो (arabian sea humpback whale) . ‘बलिन व्हेल’ या अशा व्हेल आहेत, ज्यांना तोंडात दात नसतात. दातांऐवजी आपण केस विंचरण्यासाठी जसा कंगवा वापरतो, त्याप्रमाणे जाळीदार पडदे असतात (arabian sea humpback whale). या जाळीदार पडद्यांच्या माध्यमातून ते आपले अन्न म्हणजे कोळंबीसदृश जीव, क्रिल, छोटे मासे आणि प्लवक गाळून खातात. दिवसाला हा अजस्र जीव साधारणपणे जवळपास १ हजार, ३०० किलो ग्रॅमपर्यंत अन्न खातो (arabian sea humpback whale). भारतीय रस्त्यावर दिसणार्या ‘मारुती स्विफ्ट’ या कारच्या वजनाइतके भरेल, एवढे अन्न ‘हम्पबॅक व्हेल’ खातो, असे आपणे तुलनेने बोलू शकतो (arabian sea humpback whale). या व्हेलमध्ये मादी व्हेल ही नरापेक्षा जवळपास एक ते दीड मीटर अधिक लांब असते. यांची लांबी सर्वसाधारणपणे ११ ते १७ मीटर लांब असते. भारतीय रेल्वेच्या नॉन-एसी डब्याची आदर्श लांबी ही १२.५ मीटर इतकी असते. जर तुम्ही यासोबत कल्पना केली, तर याच्या आकाराची भव्यता तुम्हाला लक्षात येईल. ‘हम्पबॅक व्हेल’पेक्षा आकाराने, वजनाने आणि लांबीने अधिक भरतील, असे सागरी सस्तन जीव आहेत, ज्यामध्ये ‘ब्लू व्हेल’चा समावेश होतो. (arabian sea humpback whale)
जगभरात ‘हम्पबॅक व्हेल’ची संख्या साधारण ६० हजार ते ९० हजार इतकी असेल, असा संशोधक मंडळींचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या संख्येने जगभरात या व्हेल विचरण करत आहेत. म्हणून ‘आययूसीएन’ने आपल्या लाल यादीत या प्रजातील ङशरीीं उेपलशीप म्हणजेच ‘मुबलक प्रमाणात’ या श्रेणीत सूचित केले आहे. आता याच ‘हम्पबॅक व्हेल’ची अरबी समुद्रात आढळणारी प्रजात ही विशिष्ट प्रदेशनिष्ठ संख्या असलेली जात आहे. या जातील ‘अरेबियन सी हम्पबॅक व्हेल’, (अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल) असे म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामधील समुद्र किनार्यांलगत ही व्हेल दिसून येते. अरबी समुद्रात आढळणार्या ‘हम्पबॅक व्हेल’ ही जगातील फक्त चारपैकी एक असलेली विशिष्ट प्रदेशनिष्ठ संख्या असलेली जात आहे. या प्रजातीला अजूनही अमेरिकेच्या संशोधित ‘एंडेंजर्ड स्पिसीज अॅक्ट’अंतर्गत (लुप्तप्राय प्रजाती कायदा) अजूनही संकटग्रस्त मानले जाते. ही प्रजात केवळ अरबी समुद्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत आढळते. मासेमारी, समुद्री प्रदूषण आणि हवामानबदलामुळे ही प्रजात आता गंभीररित्या धोक्यात आली आहे. २००९ मध्ये सुरू झालेल्या आणि सप्टेंबर २०१६ मध्ये पूर्ण झालेल्या एका सखोल अभ्यासानंतर, अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन’ने (छज) ‘एंडेंजर्ड स्पीशीज अॅक्ट’ अंतर्गत (एड) जगभरातील ‘हम्पबॅक व्हेल’च्या स्थितीत बदल केला. या नवीन सूचिमध्ये, अरबी समुद्रातील ‘हम्पबॅक व्हेल’ ही जगातील फक्त चार व्हेल समुदायांपैकी एक म्हणून ओळखली गेली आहे. ही प्रजात ‘व्हेलिंग’नंतरही (व्हेलच्या शिकारीमुळे) योग्य संतुलित संख्येपर्यंत पोहोचलेली नाही.
नोव्हेंबर 2017 मध्ये ओमानच्या किनार्यावर सॅटलाईट टॅग लावण्यात आलेल्या ‘लुबान’ नावाच्या मादी ‘हम्पबॅक व्हेल’ने कर्नाटकपर्यंत स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर केले होते. तसेच 2011 मध्ये ओमानच्या मरिराह आखातामध्ये छायाचित्रित करण्यात आलेला ’हम्पबॅक व्हेल’ 2019 साली कर्नाटकातील नेत्रानी बेटांजवळ छायाचित्रित करण्यात आला.
१९६६ मध्ये ‘इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ने ‘हम्पबॅक व्हेल’च्या व्यापारी वृत्तीने केल्या जाणार्या शिकारीवर बंदी घातली. त्यानंतर जगभरातील या प्रजातीची काही क्षेत्रांतील संख्या वाढत असल्याचे विविध वैज्ञानिक मंडळींनी सिद्ध केले आहे. जसे की स्टीविक, पी. टी. आणि इतर संशोधक चमूने २००३ मध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधानुसार उत्तर अटलांटिकमधील ‘हम्पबॅक व्हेल’च्या संख्येत वाढ झाली आहे. जेव्हा वैज्ञानिक प्राण्यांच्या संवर्धनाबाबत निर्णय घेतात, तेव्हा ते केवळ संपूर्ण प्रजातीवरच लक्ष केंद्रित करत नाहीत, तर त्याच्या विशिष्ट लोकसंख्या विभागांवरही (ऊझड) लक्ष ठेवतात. मराठीत सोप्या भाषेत सांगायचे तर, ऊझड म्हणजे एखाद्या प्रजातीच्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांत राहणार्या वेगळ्या समूहाला दिलेली संज्ञा. या समूहाची आनुवंशिकता, वागणूक किंवा नैसर्गिक वास्तव्य इतर समूहांपेक्षा वेगळे असते. उदाहरणार्थ, अरबी समुद्रातील ‘हम्पबॅक व्हेल’ ही पूर्व ऑस्ट्रेलियामधील ‘हम्पबॅक व्हेल’पेक्षा वेगळी आहे. प्रत्येक ऊझडला संवर्धन यादीत स्वतंत्र प्रजातीप्रमाणेच महत्त्व दिले जाते. ही पद्धत वैज्ञानिकांना अधिक सूक्ष्मपणे संवर्धनाचे नियोजन करण्यास मदत करते. आता हे का महत्त्वाचे आहे, तर काही व्हेल समूह संख्येने वाढत असताना, इतर काही जसे की अरबी समुद्रातील ‘हम्पबॅक व्हेल’ अजूनही धोक्यात आहे. ऊझड संकल्पनेमुळे आपण प्रत्येक समूहाची परिस्थिती वेगळ्यापणे समजून घेऊ शकतो आणि त्यानुसार संवर्धन उपाययोजना राबवू शकतो.
अरबी समुद्रातील ‘हम्पबॅक व्हेल्स’चा समुदाय (ऊझड) इतर व्हेल्सपेक्षा वेगळा आहे. कारण ही प्रजात स्थलांतर करत नाही. या व्हेल्स त्याच भौगोलिक क्षेत्रात जन्म देतात, अन्न शोधतात आणि वाढतात. हे क्षेत्र तुलनेने मर्यादित असल्याने त्यांना विशिष्ट धोके आहेत. त्यांना असलेला मोठा गंभीर धोका म्हणजे ऊर्जा संशोधन (तेल व गॅसच्या शोधासाठी होणारे समुद्री उत्खनन), मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकणे आणि बायकॅच. त्यामुळे व्हेल्सच्या लोकसंख्येतील घट किंवा वाढीचा दर गंभीररित्या कमी होऊ शकतो. त्यांना असलेले आणखी काही छोटे-मध्यम धोके म्हणजे आजार, जहाजांशी होणारी टक्कर आणि हवामानबदल (समुद्राचे तापमान व पाण्याची गुणवत्ता बदलणे) इत्यादी. जगभरातील ‘हम्पबॅक व्हेल्स’चा सर्व संख्यांमध्ये अरबी समुद्रातील ‘हम्पबॅक व्हेल्स’चा समुदाय सर्वांत लहान, सर्वांत वेगळा आणि सर्वांत जास्त धोक्यात आहे. या व्हेल्स त्यांच्या अनोख्या अनुवंशिक रचनेमुळे आणि वागण्याच्या स्वभावामुळे इतर समुदायांपेक्षा वेगळ्या आहेत. या व्हेलचा नैसर्गिक अधिवास पश्चिमेला येमेन आणि ओमानच्या किनार्यांपासून ते पूर्वेला इराण, पाकिस्तान आणि भारताच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेले आहेत. हे मर्यादित भौगोलिक क्षेत्र त्यांच्या अस्तित्वाला आणखी धोका निर्माण करते. हा समुदाय अजूनही गंभीर विलुप्ततेच्या धोक्यात आहे आणि जर तातडीने कठोर संवर्धन प्रयत्न केले नाहीत, तर भविष्यात या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. आपल्या देशात या व्हेलबद्दल भूतकाळात आणि वर्तमान स्थितीत कोणते संशोधन कार्य चालू आहे, याचा आढावा आपण या लेखाच्या पुढील भागात सविस्तरपणे वाचूया.
- प्रदीप चोगले
(लेखक ‘वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी - इंडिया’ या संस्थेत सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
9029145177