"अजित पवार आणि शरद पवार एकत्र..."; संजय राऊतांचा दावा

    21-Apr-2025
Total Views | 26
 
Sanjay Raut
 
मुंबई : शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, असा दावा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना रोहित पवारांनी एक सूचक ट्विट केले होते. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
 
हे वाचलंत का? -  "आपण मनापासून हात पूढे कराल आणि..."; राज ठाकरेंना योगेश कदमांचा मोलाचा सल्ला
 
"केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवे आणि यातच महाराष्ट्राचे हीत आहे," असे ट्विट रोहित पवारांनी केले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत. आतापर्यंत आम्ही कुणाशी भेटताना, बोलताना किंवा चहा पिताना पाहिलंत का? आम्हाला कुणाला एकत्र व्यासपीठावर पाहिलंत का? आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षणसंस्था, विद्या प्रतिष्ठान यापैकी काहीच नाही. एकत्र येण्यासाठी आम्हाला कोणतेही कारण नाही. त्यामुळे आमचे प्रेम आणि कडवटपणा टोकाचा असतो. त्यात कुठलीही भेसळ नसते," असा टोला त्यांनी लगावला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121