मोदी-शाह तुरुंगात?, पंजाब वेगळा देश? : खालसा परेड दरम्यान खलिस्तान्यांचा उन्माद केला तिरंग्याचाही अवमान!
21-Apr-2025
Total Views |
ओटावा : कॅनडातील सरे शहरात शनिवारी १९ एप्रिल २०२५ रोजी वार्षिक खालसा दिनानिमित्त वैसाखी परेडचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात भारताविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. परेड सुरू असताना ५ लाख ५० हजारांहून अधिक लोकांचा यामध्ये समावेश होता. या परेडदरम्यान, खलिस्तान्यांनी भारताविरोधात बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी केली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एस. जयशंकर यांना वॉन्टेड म्हणत हुसकावण्याचा प्रयत्न केला आहे.
सांगण्यात येत आहे की, १९६६ मध्ये शिख धर्माचे १० वे आणि अंतिम गुरू गोविंद सिंह यांनी खालसाची स्थापना वैशाख दिनी केली होती. या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हे शिख धर्मियांचे आयोजन असून दुनियातील सर्वाधिक मोठं असलेलं आयोजन आहे. हा शीख ऐक्य आणि विविधतेचा उत्सव आहे. फुटीरतावाद्यांनी हेही सोडले नाही. सर्वच शहरांमध्ये १९९८ पासून हा उत्सव साजरा केला जात आहे.
परेड प्रवक्ते मोनिंदर सिंग यांनी परेडला एकता, विविधता आणि ते सामायिक आनंदाची एक सुंदर अभिव्यक्ती म्हणून त्याचे वर्णन करण्यात आले आहे. ते म्हणाले की, सरे नगर किर्तन हे शिख समुदायासाठी आपला इतिहास, आपली परंपरा, मानवाधिकार आणि संप्रफुता प्रति प्रतिबद्धतेला समजून घेत यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. अशातच, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अनेकांसाठी, सार्वभौमत्व म्हणजे खलिस्तान चळवळ असल्याचे त्यांना वाटत होते.
परेडादरम्यान एका मोठे अवजड वाहनाचाही समावेश करण्यात आला होता. ज्यावर तुरूंगाची प्रतिमा बनवण्यात आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा समावेश करण्यात आला होता. त्या तुरूंगाच्या बाजूला शिखांचे दुश्मन असा आशय नमूद करण्यात आला होता. त्यावर खलिस्तानी निज्जरच्या मृत्युचा आरोप लावण्यात आला होता.
त्याच प्रमाणे त्याच पोस्टवर भारताला विभाजित करण्याबाबतचा आशय नमूद करण्यात आला होता. ज्यात १ नोव्हेंबर २०२५ रोजी खालिस्तान जनमत संग्रह ची घोषणा करण्यात आली होती. परेडदरम्यान मोदींनी राजनीतिला मारण्यात आले. निज्जरला कोणी मारले? 'भारतीय सरकार' अशा घोषणा देण्यात आल्या. परेडमध्ये भारतीय ध्वजाचाही अवमान करण्यात आला होता. खलिस्तानी दहशतवाद्यांनी संतोख सिंग खोला ही परेडमध्ये सहभागी होते. त्यांनी मंचावरून पंजाबला भारतापासून विभक्त करत खलिस्तान या नवीन देशाची स्थापना करायची आहे.