पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंदू महिलेला कपाळावरील कुंकू पुसून मुस्लिम धर्मांतर करण्याची धमकी
21-Apr-2025
Total Views | 10
कोलकाता (Murshidabad Violence) : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जिल्ह्यात मुस्लिम जमावाने दंगल घडवल्यानंतर काही दिवसांनी, एका हिंदू महिलेने तिच्यावर बलात्कार करण्यात येणार असल्याच्या धमक्या आणि इस्लाम स्वीकारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले आहे.
पांचजन्यशी बोलताना, ममता घोष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेने सांगितले की, त्यांनी मला सांगितले की, तुझेस जबरदस्ती मुस्लिम धर्मांतर केले जाईल. त्यांनी माझ्यावर अनेकदा बलात्कार करण्याची आणि माझे कुंकू पुसून टाकण्याची धमकी दिली आहे. त्यांनी मला सांगितले की, आम्ही भारताचे अस्तित्व नष्ट करू आणि जागेचे बांगलादेशमध्ये रुपांतर करू, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की त्यांना या ठिकाणी हिंदू नको असल्याचे तिने पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ११ एप्रिल २०२५ रोजी वक्फ सुधारित कायद्याच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार निर्माण झाला. तोडफोड, जाळपोळ, हिंदूंचे पलायन आणि हिंदू महिलांवरील होणारे अत्याचार या घटना घडल्या आहेत.
हिंदूंना निवडकपणे कसे लक्ष्ये करण्यात आले आणि ज्यात त्यांची घरे, दुकाने आणि मंदिरे यांचा यात समावेश आहे, याबद्दल एका प्रसारमाध्यमाने वृत्त दिले आहे. ११ एप्रिल रोजी जुम्म्याच्या नमाजानंतर वक्फ सुधारित कायद्याविरोधात निषेधाच्या नावाखाली हा नरसंहार सुरू झाला आणि १२ एप्रिलपर्यंस सुरू राहिला. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, हजारो हिंदूंना मुर्शिदाबादमधील त्यांची घरे सोडून इतर ठिकाणी जाऊन पलायन करण्याची वेळ आली आहे. तर काहीजण मालदा जिल्ह्यात जात आहेत.