मुर्शिदाबाद प्रकरणात बाप-लेकाला संपवणाऱ्या जियाउल शेखच्या पोलिसांनी आवळल्या मसुक्या, सीसीटीव्ही फूटेज आले समोर
20-Apr-2025
Total Views |
कोलकाता : वक्फ सुधारित कायद्यावरून झालेल्या हिंसाचारातील समसेरगंज परिसरातील जाफराबादेतील जमावाने हरोगोविंद दास वय वर्षे (७०) आणि त्यांचा मुलगा चंदन वय वर्षे (४०) यांची हत्या केली होती. हत्या करणाऱ्याचे नाव जियाउल शेख असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनवरून त्याची घटनास्थळी उपस्थिति असल्याचे सिद्ध झाले.
दक्षिण बंगलाचे सुप्रतिम सरकारने सांगितले की, वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. यासोबतच दुहेरी हत्येप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. हत्येशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जोडण्यात आलेल्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे सरकार म्हणाले आहे. इंजमाम उल हक हा गुन्ह्याशी संबंधित नसला तरीही त्याने सीसीटीव्हीसोबत छेडछाड केली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काळू नवाब आणि दिलदार नवाब यांनाही अटक करण्यात आली आहे.
भयभित परिस्थितीमुळे वडील - मुलाचे श्राद्ध घालणे शक्य नाही!
अशातच आता दास कुटुंबाला आपल्या वडिलाच्या आणि मुलाचे श्राद्ध घालणं दंगलमय परिस्थितीने शक्य झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पिता-पुत्राच्या श्राद्ध समारंभ करण्यासाठी आम्ही पुजाऱ्यांना विचारले असता, ते येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत होते. दंगलमय परिस्थितीत सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे हरोगोबिंदो यांचे नातेवाईक चित्रदीप दास म्हणाले.
पोलिसांना संपर्क करत माहिती दिली!
आम्ही दुसऱ्या पुजाऱ्याला विचारले असता, ते ५ किमी अंतरावरील बासुदेवपूरमध्ये राहतो. तो म्हणाला की, ते येऊ शकत नाही कारण इथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या घरी गेले आणि गंगाजल आणले. यापूर्वी, चंदनच्या पत्नीने गेल्या शुक्रवारी घडलेल्या घटनेची माहिती दिली की, लोकांनी आमच्या घरावर हल्ला करण्यास सुरूवात केली तेव्हा आम्ही पोलिसांशी फोनद्वारे संपर्क केला असता, त्यानंतर कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी माझ्या पती आणि सासऱ्यांनी मारहाण करून ठार मारल्यानंतर त्यांचे मृतदेह तीन तास घरानजीक अस्ताव्यस्त परिस्थितीत पडला होता.