ब्रिजेश सिंह यांची कृत्रिम बुध्दिमत्तेवर व्याख्यानमाला, पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाचा पुढाकार
20-Apr-2025
Total Views |
मुंबई : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया मुंबई चॅप्टरच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे औचित्य साधून कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका या विषयावर उद्या (दि.२१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह (भा.पो.से.) यांचे मुख्य व्याख्यान होणार आहे.
फोर्टच्या आझाद मैदानाजवळील मुंबई प्रेस क्लबमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी `द इकॉनॉमिक्स टाईम्स`चे कार्यकारी संपादक श्री. मुकबिल अहमर हे अतिथी वक्ते म्हणून संबोधित करतील. तरी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया मुंबई चॅप्टरचे सचिव डॉ. मिलिंद आवताडे यांनी केले आहे.