तुम्ही निवडणूक आयुक्त नसून मुस्लिमांचे आयुक्त; झारखंडमध्ये घुसखोरांचे अवैध ओळखपत्र बनवून मतांची गोळाबेरीज ! भाजप खासदार निशिकांत दुबेंचा हल्लाबोल
20-Apr-2025
Total Views | 40
रांची : झारखंड राज्यातील गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey) यांनी सर्वोच्च न्यायालयाला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितले की, देशात सुरू असणाऱ्या दंगलीला सर्वोच्च न्यायालयच जबाबदार आहे. अशातच भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या विधानाव्यतिरिक्त, नेत्यांना न्यायव्यवस्थेविरुद्ध विधाने करण्यापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
निशिकांत दुबे यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी यांना आपल्या रडारवर ठेवले आहे. कुरेशी यांनी दावा केला की, नवीन वक्फ कायद्याविरोधात मुस्लिमांच्या जमिनी हडप्यासाठीची भाजपची योजना असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांना माहिती आहे की, सर्वोच्च न्यायालयाविरोधात सुनावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी सरकारच्या प्रचार यंत्रनेला चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केला.
निशिकांत दुबे यांनी त्यांच्या फसवणुकीवर तीव्र हल्ला करताना लिहिले, तुम्ही निवडणूक आयुक्त नसून मुस्लिम आयुक्त असल्याचे ते म्हणाले आहेत. झारखंडच्या संथाल परगनामधील बांगलादेशी घुसखोरांना अवैधपणे सर्वाधिक ओळखपत्र आपल्याच कार्यालयात बनवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पैगंबर मुहम्मद यांचा इस्लाम हा ७१२ ला भारतात आला, त्याआधी ही भूमी हिंदूंची तसेच ही श्रद्धा आदिवासी, जैन किंवा बौद्ध अनुयायांची होती.
त्यानंतर त्यांनी असे सांगितले की, त्यांचे गाव 1189 मध्ये बख्तियार खिलजीने विक्रमशिला जाळली होती. त्यांनी माहिती दिली होती की, विक्रमशिला विश्वविद्यालयाने जगाला आतिश दीपांकर यांच्या रूपाने देशाचे पहिले कुलगुरू मिळाले. निशिकांत दुबे यांनी इशारा दिला की, "या देशाला एकत्र करा, इतिहास वाचा, पाकिस्तानची निर्मिती फाळणी करून झाली होती, आता फाळणी होणार नाही", असे ट्विट त्यांनी केले.