वास्तविक जीवनावर आधारित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

    02-Apr-2025   
Total Views | 14
 

the powerful poster of the real-life multi-starrer marathi film  aata thampacha nai! is here!

 
 
मुंबई : वास्तविक जीवनावर आधारित झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला ! झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित , शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच पोस्टर मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली, मुंबई येथील शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात आले . पोस्टर पाहून आपल्याला समजेल की या सिनेमात उत्कृष्ट मराठी कलाकारांची मोठी फौज आहे.
 
 
या पोस्टरमध्ये अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर तसेच आणखी काही बालकलाकार दिसत आहेत. चित्रपटात या सर्वांची भूमिका एकदम दमदार असणार आहे हे नक्की आपल्या दैनंदिन जीवनाच्या अडचणीतून वाट काढत आपल्या यशाची कहाणी लिहताना माणसाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते हा तुमच्या-आमच्या सारख्या एका सामान्य माणसाचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
 
 
'आता थांबायचं नाय!' या सिनेमाच्या पोस्टरवर सर्वांच्या चेहऱ्यावर आपण हसू आणि काहीतरी मिळवल्याचा, विजयाचा आनंद पाहू शकतो पण त्या हसण्यामागे किती संघर्ष आहे हे येत्या १ मे ला सिनेमागृहात कळेल. चित्रपटाची गोष्ट नक्की काय असणार, चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेप्रेमींना मल्टिस्टारर चित्रपटाचं वेड आहे, त्यात खूप दिवसांनी प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित सिनेमा येणार असल्यामुळे हा सिनेमा नक्कीच वेगळा ठरणार आहे.
 
 
'आता थांबायचं नाय!' हा सिनेमा भावनिक आणि मनोरंजक असल्याबरोबरच प्रेरणादायक आणि मनोबल वाढवणारा आहे. शिवराज वायचळ दिग्दर्शित ,उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी, धरम वालिया निर्मित मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.




अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121