संयुक्त राष्ट्रसंघाचा महिला दिन आणि मी...

    02-Apr-2025
Total Views | 10
 
United Nations Womens Day and me
 
 
संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त एक परिषद आयोजित करत असते. संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य असलेल्या 193 देशांच्या सक्रिय कार्यकर्त्यांना या परिषदेसाठी सन्मानाने बोलावले जाते. यावर्षी सुमारे 15 हजार प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित होते. त्यात भारतातून 50 जण आले असतील. त्या परिषदेत उपस्थित राहण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. त्यानिमित्ताने या परिषदेतील अनुभवांचे हे चित्रण...
 
क़ॉन्फरन्स फॉर स्टेटस ऑफ वुमन’ या विभागाच्या अखत्यारीत संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त परिषदा आयोजित करते. यावर्षीची परिषद अशा नावाने घेतली गेली. या परिषदेमध्ये केवळ निमंत्रितांना स्थान असते. त्याची अंमलबजावणी ‘एउज डजउ’ या उपविभागातर्फे करण्यात येते. जगभरातील काही सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांना सदस्य म्हणून स्वीकारले जाते. त्या संस्था विविध विषयांत कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना हुडकतात आणि त्यांची शिफारस आयोजकांकडे करतात. प्रमुखांकडे शिफारस केल्यानंतर छाननी करून ठराविक महिलांना या परिषदेचे निमंत्रण मिळते आणि तेथे उपस्थित राहण्याची संधी मिळते. मला त्या परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याचे असे झाले की, जी20 मध्ये जी20 मधील सी20 म्हणजे उर्ळींळश्र डेलळशीूं 20. नागरिकांची मते जाणण्यासाठी अशी काही संमेलने देशभरात घेतली गेली. त्याचा निष्कर्ष मूळ जी20च्या समितीकडे सुपूर्द करण्यात आला. त्यामध्ये मला कौशल्य विकास आणि शिक्षण या दोन विषयांमधील तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच वेळेला मला ‘इचखढ’ ‘बैलेरीना मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ट्रस्ट’ याच्या रत्ना जोशी भेटल्या. रत्ना जोशी ‘युएन’मध्ये सक्रिय आहेत. त्यांची ‘इचखढ’ ही सामाजिक संस्था ‘एउजडजउ’ ची मान्यताप्राप्त सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे कार्यालय न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात आहे. एउजडजउ हे संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख अंगांपैकी एक अंग आहे, जे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक, मानवतावादी आणि सांस्कृतिक उपक्रमांची समन्वयक आहे. सर्व जगाशी संपर्क साधते.
 
दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त सुमारे 20 प्रतिनिधींना घेऊन त्या न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख कार्यालयात ‘उडथ’च्या परिषदेसाठी जात असतात. सी20 वेळी त्यांनी माझे सामाजिक काम पाहिले. त्यांना आवडले. त्यांनी स्वतः प्रत्यक्षात भेटी दिल्या. संपूर्ण दस्तऐवजीकरण करून घेतले आणि मग माझी शिफारस‘णछउडथ 69’ च्या परिषदेसाठी सुमारे सहा महिन्यांपूर्वी केली. चार महिन्यांपूर्वी ‘उडथ’च्या कार्यालयाने मला निमंत्रण पाठवले. निमंत्रण आले तेव्हा मला अशा रितीने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जाऊन स्वतःची मते मांडण्याची संधी मिळेल, याची सुताराम कल्पना नव्हती. अशी अपेक्षाही मी कधी केली नव्हती, ना माझे स्वप्न होते, ना मी त्यासाठी प्रयत्न केले.
 
अचानक आलेली ही संधी पाहून मी थोडीशी गडबडले; परंतु त्यानंतर तातडीने अभ्यासाला लागले. योगायोगाने त्याच सुमारास माझ्या ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या पुस्तकाचे ई-बुक आणि ऑडिओ बुक करण्याचे काम सुरू होते; तेही मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये. माननीय सुषमा स्वराज यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत मानाने घेतले जाते. त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी जगभरात जगावर उमटवलेला आहे. हे जेव्हा रत्ना जोशी यांना कळले, तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी मला दि. 7 मार्च रोजी 8 मार्चच्या महिला दिनानिमित्त भारतीय दूतावासात होणार्‍या कार्यक्रमांमध्ये याबद्दल सादरीकरण करण्याची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची विनंती केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा माझा पहिला कार्यक्रम, प्रकट कार्यक्रम. तो अत्यंत देखणा झाला. उपस्थितांनी तो खूप वाखाणला, पण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने माननीय सुषमा स्वराज यांच्या संपर्कात आलेला होता. अनेकांनी मला त्यांचे सुषमा स्वराज यांच्याबरोबरचे अनुभवही सांगितले. मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. खरे म्हणजे माझ्या दृष्टीने ही फार मोठी घटना होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मला मिळालेला सन्मान हा केवळ अकल्पनीय असाच होता.
 
पण, त्यानिमित्ताने दि. 10 मार्चपासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत भाग घेण्याची संधी मिळाली. मी माझ्या बाजूने सर्व तयारी केली. या परिषदेची व्याप्ती फार मोठी असते. तेथे आपल्याला व्यासपीठ मिळते. हजर राहण्याची संधी मिळते. परंतु, प्रत्यक्षात बोलण्यासाठी तातडीने संधी मिळेलच, असे नाही. निमंत्रितांना परिषदेत जाण्याचे प्रवेशपत्र मिळते. ते महत्त्वाचे असते. या परिषदेमध्ये 193 देशांचे सरकारी प्रतिनिधी आपल्या देशाची भूमिका विशद करतात. महिला सक्षमीकरणाचे धोरण व अंमलबजावणी यावर चर्चा होते. बहुतांश सदस्य देश आपले वेगळे कार्यक्रम आयोजित करतात आणि आपली भूमिका विशद करतात. प्रत्येक देशाचा संयुक्त राष्ट्राशी थेट संपर्क ठेवणारा असा एक विभाग असतो. त्याला ‘परमनंट मिशन’ असे म्हणतात. भारताचे ‘परमनंट मिशन ऑफ इंडिया’ हा स्वतंत्र विभाग भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करतो. ‘परमनंट मिशन’चे प्रमुख हरीश आहेत. हे 1990 सालचे आयएफएस आहेत. ज्येष्ठ राजदूत म्हणून त्यांच्याकडे मानाने पाहिले जाते. त्यांच्या सहकारी योजना पटेल याही कर्तृत्ववान आहेत आणि मदत करण्यासाठी तत्पर असतात. ‘परमनंट मिशन’ची एकच शाखा असते, जी ‘युनो’च्या दैनंदिन कामकाजाशी संलग्न असते.
 
आपल्याला भारतीय दूतावासासंबंधी माहिती असते. कारण भारतीय दूतावास हा भारतीय नागरिकांचे हितसंबंध जपण्यासाठी अन्य देशांमध्ये स्थापन झालेला आहे. अमेरिकेतील प्रमुख दूतावास राजधानीच्या ठिकाणी म्हणजे वॉशिंग्टन डीसी येथे आहे, तर बाकी अन्य प्रमुख शहरात त्याच्या शाखा आहेत. त्याला ‘कॉन्सिलेट जनरल’ असे संबोधले जाते. न्यूयॉर्कमध्येही ‘कॉन्सिलेट जनरल’चे कार्यालय आहे. त्याचे प्रमुख बिनय कुमार प्रधान आहेत. तरुण आणि उत्साही व्यक्तिमत्त्व. चौकटीबाहेर जाऊन काहीतरी अधिक करावे, अशी इच्छा असलेले हे अधिकारी आहेत. यातील सर्व प्रमुख अधिकार्‍यांना ‘राजदूत’ किंवा ‘अ‍ॅम्बेसेडर’ या पदवीने संबोधले जाते. मला या ‘कॉन्सिलेट जनरल ऑफ इंडिया’मध्ये माननीय सुषमा स्वराज यांच्या पुस्तकाचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. राजदूतांनी माझा सन्मानसुद्धा केला. त्यानंतर दि. 10 मार्चपासून होणार्‍या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, हे अशक्य होते. 500 पेक्षा जास्त कार्यक्रम असतात. मुख्यालयातले सर्वसाधारण सभागृह म्हणजे जनरल असेम्बली हॉल येथेच प्रमुख कार्यक्रम केले जातात. येथेच उद्घाटन आणि निरोप समारंभ होतो. तेथे सुमारे 1 हजार, 800 जणांची बसण्याची सोय आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम या सभागृहातच झाला.
 
अडीच तास अगोदर जाऊन रांग लावली होती, तरीही मला चौथ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये बसण्याची संधी मिळाली. ज्यांना प्रत्यक्ष सभागृहात बसण्याची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी अन्य सर्व खोल्यांमध्ये पडद्यावर हा कार्यक्रम प्रसारित केला जातो आणि तेथे जाऊन पाहता येतो. मी चौथ्या मजल्यावर त्या बाल्कनीत बसलेली असताना माझ्या उजव्या बाजूला बांगलादेशची प्रतिनिधी होती आणि डाव्या बाजूला पाकिस्तानची प्रतिनिधी बसली होती. मला या योगायोगाची गंमत वाटली. आम्ही तिघींनी हातात हात घालून तिथे फोटो काढले. आम्ही तिघी कमालीच्या उत्तेजित झालो होतो. येथे तीन वेगवेगळे देश जरूर होते, एकमेकांशी शत्रुत्व होते, परंतु तेथे गेल्यावर मात्र आम्ही भारतीय उपखंडातील नागरिकच होतो. आमचे मूळ एकच होते. ठरल्याप्रमाणे उद्घाटन सोहळा पार पडला. अर्थातच तो देखणा व उत्साहवर्धक होता, हे वेगळे सांगायला नकोच.
 
‘बीजिंग डिक्लेरेशन’नंतर झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे, हा या वर्षीच्या परिषदेचा हेतू होता. त्यासाठी 12 संकल्पनांवर आधारित अशी चर्चासत्रे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली होती. त्याची कार्यक्रम पत्रिका सुमारे 15 दिवस आधीच आमच्याकडे आलेली होती. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्राचा जो विषय आहे, आपल्या कार्याचे जे क्षेत्र आहे, त्या चर्चासत्रात जाऊन बसण्याची संधी आपल्याला मिळते. तेथे आपण आपली मते सांगू शकतो. चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतो. सर्वसाधारणतः आपल्याला जे प्रवेशपत्र दिले जाते, ते दाखवून कोणत्याही चर्चासत्रात जाऊन बसण्याची मुभा असते. परंतु, अनेक चर्चासत्रे ही लहान खोल्यांमध्ये आयोजित केलेली असतात. त्याला मात्र आपल्याला नोंदणी करणे गरजेचे असते. मी चार संकल्पनांवरील चर्चासत्रांत जाण्याचे ठरवले होते. माझा प्रमुख विषय म्हणजे ‘कौशल्य विकासद्वारे महिला सक्षमीकरण’, ‘दिव्यांग महिलांची परिस्थिती’, ‘गरिबीमुळे होणारे महिलांचे शोषण’ आणि ‘महिलांचे आरोग्य’ या चार विषयासंबंधित चर्चासत्रांमध्ये मी जाऊन त्याचा अभ्यास करायचा ठरवला होता. त्याप्रमाणे विविध चर्चासत्रांमध्ये मी गेले. खूप शिकायला मिळाले. विविध व्यक्ती, त्यांनी केलेले प्रचंड सामाजिक कार्य, त्यांचे अनुभव यापुढे आपल्याला अजून खूप सारे करायचे बाकी आहे, असेच जाणवत होते. संधी मिळाली, तर आपला मुद्दा केवळ 20 सेकंद ते दोन मिनिटे या वेळामध्येच मांडावा लागतो. आपण जर प्रमुख वक्ता असू, तर जास्तीत जास्त दहा मिनिटे.
 
मी त्याप्रमाणे सर्व तयारी करून गेले होते. पण, त्यापलीकडे जाऊन सर्वसामान्य प्रतिनिधींशी बोलताना दोन मुद्द्यांवर त्या प्रतिनिधींना उत्सुकता आहे, असे आढळून आले. माझे झोपडपट्टीमधले कार्य आणि काश्मीरमधील केलेले थोडेसे काम. अनेक प्रतिनिधींशी त्याच्यावर चर्चाही झाल्या. चर्चा सत्रातसुद्धा प्रश्नोत्तर स्वरूपात झाल्या, त्या वेगळ्या. परंतु, अनौपचारिकरित्या झालेल्या संवादातूनच खूप सार्‍या गोष्टी घडत असतात, प्राप्त होतात. मलाही पुढे काम करण्याच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध झाल्या. प्रेरणा मिळाली आणि चालनाही मिळाली. माझ्या निरीक्षणातून तीन प्रमुख गोष्टी मी नमूद करू इच्छिते. त्या म्हणजे, सर्व जगभरात महिलांच्या समस्या या जवळपास समानच आहेत. भारताचा अन्य देशांशी तौलनिक अभ्यास करताना आपण खूप सुखी आहोत. आफ्रिकन देशांमधील प्रतिनिधी सर्वांत जास्त प्रमाणात होते. अरब किंवा इस्लामिक देशातील लोक अभावानेच आढळून आले. त्यात जे काही होते, ते त्यांच्या मूळ देशात राहात नव्हते. ‘दिव्यांग महिला’ हा विषय दुर्लक्षितच होता. सर्वांत जास्त महिलांवरील अत्याचार व त्यांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय होता. निरोपाच्या सत्रातसुद्धा अनेक देशांच्या प्रतिनिधींनी महिला व मुलींची सुरक्षितता यावर भाष्य केले.
 
‘महिला सक्षमीकरणातील पुरुषांची भूमिका’ या विषयावर मी सुमारे 25 ते 30 पुरुषांशी बोलले, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, महिलांचे सक्षमीकरण व्हावे, त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, हे जवळपास सर्वांनाच मान्य होते. पण, ते कशा रितीने करायचे आणि ते करण्यासाठी स्वतः काय करणार, पुरुष जातीला कायकरावे लागेल, हे मात्र अनेकांना स्पष्टपणे सांगता येत नव्हते. आशेचा किरण मला दिसला तो तरुण पुरुष मनांमध्ये. एका विद्यार्थ्याने मला अगदी थोडक्यामध्ये सांगितले. तो म्हणाला की, माझ्याप्रमाणेच माझ्यासमोरील महिलाही एक व्यक्ती आहे आणि त्याप्रमाणेच मी तिला वागवणे म्हणजेच महिला सक्षमीकरणामधील पुरुषांचा सहभाग वाढवणे आहे. त्यासाठी पुरुषांना स्वतःशी झगडावे लागणार आणि तेव्हाच समानतेचे उद्दिष्ट साध्य होईल.
 
 मेधा किरीट
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121