ठाणे : ( Sri Chaitanya Sampradaya 55th ramnavmi ) ठाणे पूर्व भागातील श्री चैतन्य सांप्रदाय भजनी मंडळाच्या विद्यमाने चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पुरातन श्री विठ्ठल मंदिरात ३० मार्च ते ७ एप्रिल दरम्यान ५५ व्या श्री रामनवमी जन्मोत्सवासह अखंड हरिनाम यज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री संत सेवक ह.भ.प.ज्ञानेश्वर किसन जमदाडे यांनी दिली.
गुहागरचे वसंत टाणकर, कोल्हापूरचे बी.पी.मिरजकर, बागमांडल्याचे सदानंद कनिकभट आदी प्रवचनकार, साताऱ्याचे दिगंबर सुतार, श्रीक्षेत्र पंढरपूर येथील सदगुरु विठ्ठल महाराज तात्यासाहेब बाबासाहेब वासकर, नवी मुंबईतील नरेश मुरकर हे कीर्तनकार सहभागी झाले आहेत.
मुंबईचे मृदुंगमणी चंद्रकांत समजिस्कर, ठाण्याचे सुरेश कावजी व ज्ञानेश्वर जमदाडे सहभागी झाले आहेत. ७ एप्रिलरोजी श्री रामरायच्या सवाद्य पालखी सोहळ्याने श्री रामनवमी जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.