वक्फ सुधारणा विधेयक २०२५ लोकसभेत सादर, श्रीकांत शिंदेंनी उबाठाचे टोचले कान म्हणाले तुम्ही तर औरंग्याचे वकील
02-Apr-2025
Total Views | 16
नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक २०२५ (Woqf Bill) लोकसभेत सादर करण्यात आले आहे. या विधेयकावर झालेल्या चर्चेत शिवसेना खासदार श्रीकात शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला आहे. संसदेत उबाठा गटाने मांडलेल्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले असून त्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर तुम्ही असं भाषण केलं असतं का? असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ते दिल्लीतील संसदेत २ एप्रिल रोजी बुधवारी बोलत होते.
आज सर्वात महत्त्वाचा दिवस असून पहिल्यांदा ३७० त्यानंतर ट्रिपल तलाक आणि CAA नंतर गरीब मुस्लिमांसाठी वक्फ बोर्ड विधेयक सादर करणार आहे. यावेळी बोलताना त्यांनी आज अरविंद सावंत यांना टोकले. वक्फसाठी हिरवं जाकेट घातलंय की, बुधवारसाठी घातलं?, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, जर आज बाळासाहेब असते तर तुमची भाषा अशी असती का? तुम्ही केलेल्या चुकांना सुधारण्याची सुवर्णसंधी होती. विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी बाळासाहेबांनी आंदोलन केलं होतं. मात्र, उबाठाने ही विचारधारा बुलडोजरखाली चिरडली अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.
Shrikant Shinde rips apart JANAB Uddhav Thackeray & his clown mandali🔥 ~ Today, he OPPOSED the Waqf Act - stamping his political Islamization.
The real Shiv Sena stood firm, backing it & carrying forward Balasaheb Thackeray’s legacy. No room for double standards👏🏼 pic.twitter.com/JjKBdBcBGb
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) April 2, 2025
हिंदुत्वाची रक्षा, देशाची एकता आणि अन्य धर्मियांना सन्मान देणे ही त्यांची विचारधारा होती. बाळासाहेब जर असते तर त्यांनी उबाठाचे भाषण वाचले असते तर त्यांना खपूच त्रास निर्माण झाला असता. उबाठाने वक्फ बोर्डात गैर मुस्लिम नको अशी मागणी केली. त्यावरही श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, उबाठा वकिली करत असून त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. आज ठाकरे गट औरंगजेबाच्या विचारांवर चालत असून ते त्यांची वकिली करत आहेत. पालघरमधील झालेल्या साधू हत्याकांडावर कधीही एक पत्र लिहिलं नाही अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. औरंगजेबाचा मुद्दा निघाल्याने उबाठाची अस्वस्थता वाढलेली आहे.
वक्फच्या नावाखाली ज्या गरीब मुस्लिमांचा अधिकार हिसकवण्यात आला त्यांच्यासाठी हे विधेयक आधार आहे. विरोधकांनी त्यांच्या कायम व्होट बँक म्हणूनच वापर केलेला आहे. शहाबानो प्रकरणात न्यायालयाने त्यांना न्याय दिला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनी सत्तेत असताना वक्फची मालमत्ता लाटण्याचं काम केल्याचं सांगितलं आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी भरसंसदेत भाष्य केले.