कृती आराखड्याची अंमलबजावणी करा

‘एसआरए’ सीईओ पराग सोमण यांचे अधिकार्‍यांना निर्देश

    02-Apr-2025
Total Views | 10
 
 SRA CEO Parag Soman on Implement the action plan
 
 
ठाणे: ( SRA CEO Parag Soman on Implement the action plan ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार १०० दिवसांमध्ये सात कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी नियोजनबद्ध कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राधिकरणातील अधिकारी वर्गास दिले आहेत.
 
१०० दिवसांचा कृती आराखड्याच्या अनुषंगाने प्राधिकरणाविषयी माहिती देणारे अद्ययावत संकेतस्थळ सर्वसामान्य नागरिकांकरिता तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत तसेच, संकेतस्थळावर ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ’, ‘माहिती अधिकार अधिनियम २००५ ’ची माहिती, प्राधिकरणाची परिपत्रके, झोपडीधारकांच्या पात्रतेची परिशिष्ट-२ तसेच, ‘महाराष्ट्र झोपडपट्टी (सुनिवपू) अधिनियम १९७१ ’चे लिंक उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याकरिता प्राधिकरणाच्या एकूण २२ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सोमण यांनी प्राधिकरणातील अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.
 
सदनिका हस्तांतरणासाठी व घरभाड्यासाठी लाभार्थ्यांना प्राधिकरणात फेर्‍या माराव्या लागणार नाहीत. याकरिता ऑनलाईन प्रक्रिया सुरू करणे, तसेच नोंदणीकृत सहकारी संस्थांच्या बाबतीत लेखापरीक्षण/निवडणूक व इतर विषयांशी संबंधित बाबी नियंत्रणात आणण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
 
झोपडीधारकांच्या प्राप्त होणार्‍या तक्रारी, आपले सरकार व पोजी पोर्टलवरील तक्रारींचा तत्काळ निपटारा करून प्रलंबित तक्रारींचे प्रमाण शून्य करण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले आहे. कार्यालयाची वाटचाल हरित कार्यालयाकडे करण्याकरिता अपारंपरिक ऊर्जाचा जास्तीत जास्त वापर सुरू करण्याबाबत तसेच, प्राधिकरणात स्वच्छता ठेवण्याबाबतही सोमण यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.
 
‘संगणकीय प्रणाली’चे अवलंबन करा
 
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ‘झोपु’ योजनांना गती देण्याकरिता प्राधिकरण नियमित प्रयत्नशील आहे. ‘झोपु’ योजनांना लवकर मान्यता मिळण्याकरिता ऑनलाईन ‘बिल्डिंग पर्नेन अ‍ॅप्रुव्हल मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रणाली तसेच झोपडीधारकांची पात्रता पारदर्शकपणे पार पाडण्याकरिता ‘संगणकीय प्रणाली’चे तत्काळ अवलंबन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121