उबाठा गटाला मोठा धक्का! चंद्रकांत खैरेंवर गंभीर आरोप अन् शिलेदाराचा राजीनामा
02-Apr-2025
Total Views |
छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाचे छत्रपती संभाजीनगर येथील पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आहे. मंगळवार, १ एप्रिल रोजी राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित चंद्रकांत खैरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पत्रात नेमके काय?
राजू शिंदे आपल्या पत्रात म्हणाले की, "उद्धवजी ठाकरे साहेब आणि अबांदासजी दानवे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता. आपणही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी आणि सहकारी आपले आभारी आहोत. परंतू, काही कारणास्तव तसेच चंद्रकांत खैरेसाहेब यांच्याबद्दल नाराजी असून मी आणि माझे सर्व समर्थक, सहकारी यांच्यासह शिवसेना पक्षाचा आणि विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे."
कोण आहेत राजू शिंदे?
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राजू शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात उबाठा गटाकडून निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत राजू शिंदे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी तब्बल १लाख ६ हजार१४७ मते घेतली होती. दरम्यान, आता त्यांच्या राजीनाम्याने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.