मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Public Supports Waqf Amendment Bill) वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा होत असताना, एका विशिष्ट समुदयाच्या लोकांमध्ये सुद्धा आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील मुस्लिम समाजाच्या लोकांनी या विधेयकास रस्त्यावर उतरून समर्थन दिले आहे. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचेच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विधेयकाच्या बाजूने समर्थन देऊन त्यांनी एकाअर्थी विरोधकांना चांगलीच चपराक लगावल्याचे दिसते आहे.
संसदेत या विधेकावरून दोन गट तयार झाले आहेत. सत्ताधारी पक्ष या विधेयकाला मुस्लिम समाजाच्या हिताचे म्हणत आहेत, तर काँग्रेससह इतर विरोधी पक्ष या विधेयकाला मुस्लिमांच्या हक्कांवरचा हल्ला म्हणत आहेत. मात्र भोपाळ मधील मुस्लिम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून विधेयकाच्या बाजूने दिलेले समर्थन, म्हणजे विरोधकांना ही चांगलीच चपराक म्हणावी. ज्या अर्थी मोदी सरकारने तिहेरी तलाख रद्द करत मुस्लिम महिलांचे जीवन सुखकर केले, त्याच प्रमाणे हे विधेयक सुद्धा आपल्या समाजाच्या हिताचेच असल्याचे, या समाजातील महिलांचे म्हणणे आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक