अल्पसंख्याक हिताच्या निर्णयांवर विरोधकांकडून फेट नरेटिव्हची चादर

    02-Apr-2025   
Total Views | 13

Opposition spreads fake narrative on minority interest decision
(Opposition spreads fake narrative on minority interest decision)

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर अनेक धाडसी निर्णय या काळात घेण्यात आले. यापैकी काही निर्णय थेट अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित होते. त्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), तिहेरी तलाक रद्द करणे, समान नागरी संहिता (यूसीसी) यांचा समावेश आहे. यावर व्यापक चर्चाही झाली आणि काहींनी विरोधही केला. काहींनी या निर्णयांना धार्मिक स्वातंत्र्य आणि अस्मितेला धोका असल्याचेही म्हटले. मात्र मोदी सरकारने दिलेला शब्द पूर्ण करून दाखवलाही आणि अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांनाही कुठला धक्का पोहोचला नाही.

मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) विधेयक, २०१७ जेव्हा लोकसभेत सादर केले गेले तेव्हा तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, या विधेयकाचा उद्देश तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करणे हा होता. हे विधेयक मुस्लिम महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या पतीकडून मनमानी पद्धतीने घटस्फोट घेण्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी होते. २२ ऑगस्ट २०१७ रोजी सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाक असंविधानिक घोषित केला होता. जुलै २०१९ मध्ये विधेयक कायदा बनले.

हे वाचलंत का? : परदेशांत वक्फ बोर्डाची स्थिती एकदम वेगळी; सरकारी नियंत्रणासह कायद्यांतही सुधारणा; काय सांगतो अहवाल?

तिहेरी तलाक रद्द केल्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणणे हे मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल होते. देशातील काही इस्लामिक संघटनांनी या कायद्याला सर्वाधिक विरोध केला होता. सीएए कायदा २०१९ मध्ये मंजूर करण्यात आला, याचे उद्दिष्ट पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन निर्वासितांना नागरिकत्व देण्याचे होते. काही इस्लामिक संघटनांनी समजून न घेता हा कायदा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) शी जोडला. त्यामुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षितता पसरली आणि देशभरात निदर्शने झाली. अल्पसंख्याक समुदाय आणि विरोधकांनी हा कायदा भेदभावपूर्ण मानला आणि म्हटले की हा कायदा धर्माच्या आधारावर नागरिकत्वाची व्याख्या करतो. तेव्हा सरकारने असा युक्तिवाद केला की हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नसून धार्मिक छळ सहन करणाऱ्या अल्पसंख्याकांना आश्रय देण्यासाठी आहे. या कायद्यामुळे कोणीही नागरिकत्व गमावणार नाही.

समान नागरी कायदा (यूसीसी) हा भाजप सरकारचा महत्त्वाचा अजेंडा आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख केला आहे. केंद्रीय स्तरावर यूसीसीचा अद्याप कायदा झालेला नाही, मात्र मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. उत्तराखंडमध्ये हा लागू करण्यात आला असून गुजरात हा कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या कायद्याच्या गरजेचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. सरकारचा असा युक्तिवाद आहे की यूसीसी लैंगिक समानता आणि राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देईल. घटनेच्या कलम ४४ मध्येही याचा उल्लेख आहे. काही इस्लामिक संघटनांनी यास शरियतवरील सरकारचा हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच हा कायदा धार्मिक अधिकारांवर अतिक्रमण असल्याचे म्हटले आहे.

या तीन महत्त्वाच्या टप्प्यांनंतर केंद्र सरकार वक्फ (सुधारणा) विधेयक समोर आणले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेत मांडण्यात आले होते. हे विधेयक वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापन आणि मालमत्तांमध्ये सुधारणा करण्यासाठी आहे, त्यात गैर-मुस्लिम सदस्यांचा समावेश, मालमत्ता सर्वेक्षण आणि पारदर्शकता यासारख्या तरतुदी आहेत. या कायद्याचा उद्देश वक्फ मालमत्तेतील भ्रष्टाचार आणि गैरवापर रोखणे तसेच महिला आणि मागासलेल्या मुस्लिमांना फायदा मिळवून देणे हा आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयत उलेमा-ए-हिंद सारख्या संघटनांनी याला वक्फच्या स्वायत्ततेवर हल्ला म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गैर-मुस्लिमांना बोर्डात समाविष्ट करणे म्हणजे धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप आहे. वास्तविक वक्फ सुधारणा विधेयकामुळे उलट अल्पसंख्याक समुदायाचाच फायदा आहे. विधेयकामध्ये वक्फ मंडळावर दोन सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. हे अधिकारी हिंदू वा मुस्लीम वा इतर धर्माचे असू शकतात. त्याव्यतिरिक्त, बिगर-मुस्लीम सदस्यांमध्ये दोन बिगर-सरकारी सदस्यांचा समावेश केला जावा. हे सदस्य हिंदू वा इतर मुस्लिमेतर धर्मातील असतील, अशी महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे. प्रस्तावित सुधारणांचा उद्देश वक्फ संपत्तीचे योग्य व्यवस्थापनासाठी एक व्यवस्थित आणि कायदेशीर रुपात बळकट चौकट तयार करणे हा आहे. वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी हे विधेयक आणले. या विधेयकामधून कुठल्याही समुदायाच्या अधिकारांवर गदा आणण्याचा हेतू नाही. वक्फ दुरुस्ती विधेयक ही काळाची गरज आहे. परंतु प्रत्येक चांगल्या कामाला काही लोकं विरोधच करत आहेत आणि यापूर्वीही करत आलेत.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121