उबाठा गट म्हणजे वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी...; मंत्री नितेश राणेंचा घणाघात

    02-Apr-2025
Total Views | 37
 
Nitesh Rane Uddhav Thackeray
 
मुंबई : आजचा उबाठा गट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणारी आणि वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी हिरवीसेना झाली आहे, असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
 
 
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपला हिंदुत्व शिकवायची संजय राजाराम राऊत यांची लायकी नाही. ज्यांनी ३७० हटवले, राम मंदिर उभारले, समान नागरिक कायद्याकडे पाऊल टाकले, त्या पक्षाला तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार? थोडीशी लाज असेल तर राऊतांनी औरंगझेब फॅन क्लबचे म्होरक्या आणि आपले मालक उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या दोन गोष्टी सांगाव्यात."
 
हे वाचलंत का? -  ‘हिरवी कावीळ' झालेल्यांना वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही असे वाटणे साहजिक
 
"भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावे की, तुम्ही गोधडी ओली करत होतात तेव्हा भाजप आणि देवेंद्रजी राम मंदिरासाठी कारसेवा करत होते.आजचा उबाठा गट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणारी आणि वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी हिरवीसेना झाली आहे. ठाकरे गटानं हिंदुत्वाचा पीळ सोडून दिला आहे, आणि आता काँग्रेसच्या अजेंड्यावर हिंदुत्वाशी लबाडी करत आहे," अशी टीका त्यांनी केली.
 
...म्हणून तुम्हाला राम आणि कृष्ण कळणार नाहीत!
 
"राम आणि कृष्ण आले आणि गेले असे संजय राजाराम राऊत म्हणाले. पण आजही हिंदू प्रभू राम आणि श्रीकृष्णांवर श्रद्धा ठेवून आहे. तुम्ही जनाबी परंपरा पाळायला सुरूवात केल्यामुळे राम आणि कृष्ण तुम्हाला कळणार नाहीत. महाराष्ट्रातील जनता सगळी सत्य परिस्थिती पाहत आहे. संजय राऊत यांनी कितीही वटवट केली तरी लोकांना आता मूर्ख बनवता येणार नाही," असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121