प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूद्वेषाच्या कहाण्या वर्णाव्या त्या किती! कारण, मुख्यमंत्री म्हणून आता तिसरा कार्यकाळ सुरू असलेल्या ममतादीदींनी हिंदूंना प्रारंभीपासूनच गृहीत धरले. आपण हिंदूंशी कसेही वागलो, तरी बंगाली अस्मितेच्या नावाखाली बंगाली हिंदू आपल्या पाठीशीच सदैव उभा राहील, हा दीदींचा भ्रम. म्हणूनच हिंदूंना खिसगणतीतही न मोजणार्या दीदींनी आपले सगळे लक्ष मुख्यत्वे मुस्लीम मतदारांकडे वळवले. बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीची वाढलेली ताकद हेच त्यामागचे कारण. आज बंगालमध्ये तब्बल 40 टक्क्यांहून अधिक मतदार हे एकट्या मुसलमानांचे. हे लक्षात घेता, मुस्लीम मतपेढीचे हेच समीकरण जपण्यासाठी ममतादीदींनी लांगूलचालन हेच सरकारी धोरण असल्याप्रमाणे राज्यकारभार केला. म्हणूनच परवा ईदच्या मिरवणुकीत सामील झालेल्या दीदींनी ‘हम गंदा धर्म को नहीं मानता हैं’ अशी दर्पोक्ती केली.
प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूद्वेषाच्या कहाण्या वर्णाव्या त्या किती! कारण, मुख्यमंत्री म्हणून आता तिसरा कार्यकाळ सुरू असलेल्या ममतादीदींनी हिंदूंना प्रारंभीपासूनच गृहीत धरले. आपण हिंदूंशी कसेही वागलो, तरी बंगाली अस्मितेच्या नावाखाली बंगाली हिंदू आपल्या पाठीशीच सदैव उभा राहील, हा दीदींचा भ्रम. म्हणूनच हिंदूंना खिसगणतीतही न मोजणार्या दीदींनी आपले सगळे लक्ष मुख्यत्वे मुस्लीम मतदारांकडे वळवले. बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीची वाढलेली ताकद हेच त्यामागचे कारण. आज बंगालमध्ये तब्बल 40 टक्क्यांहून अधिक मतदार हे एकट्या मुसलमानांचे. हे लक्षात घेता, मुस्लीम मतपेढीचे हेच समीकरण जपण्यासाठी ममतादीदींनी लांगूलचालन हेच सरकारी धोरण असल्याप्रमाणे राज्यकारभार केला. म्हणूनच परवा ईदच्या मिरवणुकीत सामील झालेल्या दीदींनी ‘हम गंदा धर्म को नहीं मानता हैं’ अशी दर्पोक्ती केली. त्यावरून नेमका ‘गंदा धर्म’ कोणता हे दीदींनी सांगावे, म्हणून त्यांच्यावर टीकेची झोडही उठली. दीदींचा अर्थोअर्थी धर्म हिंदू. त्यामुळे मग हिंदू धर्मालाच ‘गंदा’ ठरवून, तो आपण मानत नसल्याचीच कबुली एकप्रकारे दीदींनी दिली. त्यामुळे सनातन धर्माची डेंग्यूशी तुलना करणार्या स्टॅलिन पुत्रानंतर आता ममतादीदीही हिंदू धर्मावर अभद्र टीका करून मोकळ्या झाल्या.
ईदनिमित्त समोर जमलेल्या तमाम दाढीवाल्यांना खूश करण्यासाठीच दीदींना ‘गंदा धर्म’ अशा विवेकशून्य टिप्पणीचा आधार घ्यावा लागला, हे सर्वस्वी दुर्दैवी. अशाप्रकारे हिंदूंना, हिंदू धर्माला हीन लेखून आपली सेक्युलरवादी प्रतिमा उजळवण्याचाच हा निंदाजनक प्रयत्न. एवढाच जर हिंदू धर्म ‘गंदा’ वाटतो, त्याच्या रूढीपरंपरा, हिंदू बांधवांचे सणउत्सव दीदींच्या नजरेत खुपतात, ‘जय श्रीराम’च्या नार्यानेच त्यांचा संताप होतो, तर त्यांनी सरळ हिंदू धर्माचा त्याग करावा. इस्लाम, त्यांच्या धार्मिक परंपरा दीदींनी मोठ्या मनाने स्वीकाराव्या आणि अगदी अमलातही आणाव्या. धर्मांतराला एरवी समर्थन देणार्या दीदी स्वतः असे धारिष्ट्य दाखवतील का? तसाही दीदींना मुस्लीम समाजाचा व्यापक पाठिंबा आहेच. मग ‘गंद्या धर्मा’वर वारंवार चिखलफेक करण्यापेक्षा, दीदींनी ‘बानो’, ‘खाला’ वगैरे काय मिरवायचे ते कायमचे बिरुद मिरवावे. कारण, आता बंगालमधील हिंदूंचाही दीदींवरील विश्वास उडाला आहेच. अशी ‘गंदगी’ आता हिंदूंनाही नकोशीच!
बांगलादेश नव्हे बंगाल!
मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे स्वीकारल्यानंतर तेथील हिंदूंच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण झाला. हजारो हिंदूंची निर्घृणपणे कत्तल करण्यात आली, घरे जाळण्यात आली, दुकाने भस्मसात झाली. बांगलादेशातील हिंदू आजही जीव मुठीत धरून कसाबसा श्वास घेतोय. मुस्लीमबहुल बांगलादेशातील हे विदारक वास्तव. पण, हिंदूबहुल असलेल्या प. बंगालमध्ये आता हिंदू बांधवच सुरक्षित नाही, अशी भीषण परिस्थिती. एकट्या मार्च महिन्यात बंगालमध्ये हिंदूंवरील आठ हल्ले नोंदवण्यात आले. मुर्शिदाबादमध्ये काही समाजकंटकांनी हिंदूंची दुकाने आणि मालमत्तांची नासधूस केली आणि त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. एवढेच नाही, तर या प्रकरणाचा व्हिडिओ ‘ट्विट’ करत, हिंदूंना लक्ष्य करणारे ममता बॅनर्जी यांच्याच तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही राज्यातील भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला. हिंदूंची घरे, दुकानेच नव्हे, तर हिंदूंची मंदिरे, देवीदेवताही बंगालमध्ये सुरक्षित नाहीत. दि. 7 मार्च रोजी शेख इंदू नामक एका धर्मांधाने शीतलादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली आणि मूर्तीलाच चक्क आग लावून टाकली. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यातही दिले. पण, पोलिसांनी ही व्यक्ती माथेफिरू आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे कारण देत, प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला. अशाच हिंदू देवीदेवतांच्या मूर्तींना बशीरहाट, नंदीग्राममध्ये मार्च महिन्यात लक्ष्य करण्यात आले. पण, या सगळ्या प्रकरणी पोलिसांची कारवाई आणि सरकारची भूमिका ही संशयास्पद अशीच. याचाच अर्थ, हिंदूंवरील हल्ल्यांना ममतादीदींच्या सरकारचे मूकसमर्थन असल्याचेच दिसून येते. पण, तरीही ममता बॅनर्जींना बंगालमध्ये हिंदू असुरक्षित आहेत, असे कदापि वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने हा सगळा ‘बाम-राम’ अर्थात कम्युनिस्ट आणि भाजपचा अजेंडा. त्यामुळे ज्या ज्या हिंदूंवर, त्यांच्या घरांवर, दुकानांवर हल्ले होतात, त्यांना सरसकट संघ-भाजपचे ठरवून ममतादीदी मूग गिळून गप्प बसल्या आहेत. आपण बांगलादेशातील हिंदूंच्या सर्वांगीण स्थितीबाबत वारंवार चिंता व्यक्त करतो. पण, आपल्याच देशातील बंगालमध्ये ‘हिंदू खतरे में हैं’ अशी भयावह स्थिती. त्यामुळे बंगाली हिंदूंनी आता रस्त्यावर आणि नंतर मतपेटीतून दीदींचे जुलमी शासन उलथवण्याशिवाय हिंदू सुरक्षित होणे नाही!