एलन मस्क पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावणारे ट्विट चर्चेत!

    02-Apr-2025   
Total Views | 44

Elon Musk Tweet regarding Swastik

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Elon Musk Tweet regarding Swastik) 
टेस्ला कंपनीचे सह-संस्थापक, सीईओ आणि अमेरिकन सरकारमध्ये गव्हर्नमेंट इकॉनॉमी (DOGE) प्रमुख एलन मस्क यांच्याविरोधात एकीकडे तीव्र निदर्शने होत असताना, त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे, स्वस्तिक चिन्ह समजण्यात त्यांची झालेली गफलत. खरंतर स्वस्तिक चिन्हं हिंदूंसाठी पवित्रंच मात्र एलन मस्क यांना ज्या चिन्हाचा उल्लेख स्वस्तिक म्हणून केलाय, ते स्वस्तिक नाही. ते नाझी द्वेषाचे प्रतीक असलेले हेकेनक्रूझ चिन्ह आहे...नेमकं प्रकरण काय... का एलन मस्कना टार्गेट केलं जातंय... वाचा सविस्तर.
 
 
गेल्या काही दिवसांपासून टेस्लाची वाहने आणि त्याच्या सुपरचार्जर नेटवर्कवर अनेक ठिकाणी हल्ले होताना दिसतायत. अमेरिकेच्या विविध भागात त्यांना लक्ष्य केलं जातंय. युरोपातही हल्ले झाले आहेत. दि. ३१ मार्च रोजी एलन मस्क यांनी ट्विटरवरील एका व्हिडिओवर कमेंट करत रिट्विट केले. त्यात टेस्ला मालक आणि एका अनोळखी व्यक्तीचा एकमेकांशी वाद होताना दिसतंय. त्या अनोळखी माणसाने टेस्ला EV वर नाझी चिन्ह लावले होते. त्याबाबत एलन मस्कने लिहिलेल्या पोस्ट मध्ये चिन्हाचा स्वस्तिक म्हणून उल्लेख केला आहे. (Anyone who scrawls a swastika on a Tesla has obviously committed a hate crime) "ज्याने टेस्लावर स्वस्तिक काढले त्याने स्पष्टपणे द्वेषपूर्ण गुन्हा केला आहे,"


एलन मस्क यांचे हे ट्विट निश्चितच चर्चेचा विषय आहे. कारण झुकलेल्या क्रॉसला अनेकदा स्वस्तिक समजले जाते, परंतु प्रत्यक्षात ते नाझी हेकेनक्रूझ चिन्हं आहे, जे द्वेषाचे प्रतीक म्हणून कुप्रसिद्ध आहे. हिंदूंसाठी पवित्र असलेले स्वस्तिक आणि नाझी द्वेषाचे प्रतीक हेकेनक्रूझ यांच्यात खूप फरक आहे. स्वस्तिक चिन्हाचा उगम भारतात झाला, असे अनेक विद्वानही मान्य करतात. हे चिन्ह हिंदू, बौद्ध आणि जैन तसेच वायकिंग आणि ग्रीक लोकांसह इतर प्राचीन संस्कृतींसाठी सौभाग्य, समृद्धी आणि सर्व शुभ गोष्टींचे प्रतीक आहे.

हिंदू परंपरेनुसार स्वस्तिकातील रेषांना सारूप्य, सालोक्य, सामिप्य आणि सायुज्य असे म्हणतात. जे दैवी मिलनाच्या विविध स्तरांचे प्रतिनिधित्व करतात. स्वस्तिकचा प्रथम उल्लेख वेदांमध्ये करण्यात आला आणि विश्वाचा निर्माता सूर्य आणि ब्रह्मा यासारख्या गोष्टींचे प्रतीक आहे. स्वस्तिकास शक्तीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते तसेच ते सौभाग्याची देवता श्रीगणेशाचे सुद्धा प्रतीक आहे. हिंदू आणि जैन धर्म या दोन्ही धर्मात, स्वस्तिकचा वापर खाते पुस्तकांची सुरुवातीची पाने म्हणा... दरवाजे किंवा उंबरठा चिन्हांकित करण्यासाठी केला जातो.

२०१३ मध्ये, अमेरिकन ज्यू कमिटीने, जगातील सर्वात जुन्या ज्यू संघटनांपैकी एक, हिंदू, जैन आणि बौद्ध संस्कृतींद्वारे शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या स्वस्तिक आणि त्याच्या नाझी आवृत्तीमधील फरक स्पष्ट केला. २०१२ मध्ये ओरेगॉन शिक्षण विभागाने हा फरक कायदेशीर केला. दोन्ही पूर्णपणे भिन्न असले तरीही पाश्चात्य माध्यमे त्यांच्या अहवालांमध्ये नाझी हेकेनक्रूझसाठी स्वस्तिक हा शब्द जाणूनबुजून वापरत आहेत. पाश्चात्य माध्यमांना हिंदू चिन्ह हे द्वेषाचे प्रतीक मानले जावे आणि लोकांमध्ये हिंदूंच्या विरोधात रोष पसरवावा असेच वाटते.

इलॉन मस्क यांनी नाझी चिन्हाला स्वस्तिक म्हणणे ही संस्कृतीबद्दल असलेली ज्ञानाची कमतरता आणि असंवेदनशीलतेची बाब आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण ज्या चिन्हाला ज्यूंबद्दल द्वेष आणि नरसंहाराचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं त्याचा समृद्धीचे प्रतीक स्वस्तिक म्हणून उल्लेख करणे, हे चूकीचेच आहे. मस्क यांना टेस्ला वाहनांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण अशा पद्धतीने चिन्हाची माहिती न घेता... त्याला धरून एखादी कमेंट करणे योग्य नाही.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121