उद्धव ठाकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यास...; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

    02-Apr-2025
Total Views | 131
 
Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यास त्यांच्या मनात बाळासाहेबांचा विचार आहे, असे आम्ही समजू. परंतू, त्यांनी विरोधात मतदान केल्यास ते हिंदूत्वाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही असे विधान संजय राऊतांनी केले होते. यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत येणार आहे. यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर वक्फ सुधारणा विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे हे त्यांनी संजय राऊतांना समजावले असते. पण आता त्यांना समजावून सांगणारे कोणीही शिल्लक नाही. उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यास त्यांच्या मनात बाळासाहेबांचा विचार आहे, असे आम्ही समजू. परंतू, त्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यास ते हिंदूत्वाच्या विरोधात असून मतपेढीच्या राजकारणासाठी आणि मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी हे करत आहेत, असे आम्ही समजू. उद्धव ठाकरेंच्या लोकांनी या विधेयकाला विरोध केल्यास त्यांची पूर्ण शिवसेना रिकामी होईल."
 
हे वाचलंत का? -  वक्फ सुधारणा विधेयकावरून संजय राऊतांचा अजब दावा! म्हणाले, वक्फचा आणि हिंदुत्वाचा...
 
वक्फ बोर्डाचा आणि हिंदूत्वाचा संबंध कसा नाही?
 
"वक्फ बोर्डाने ज्याप्रकारने हिंदुत्ववादी लोकांवर अन्याय केला, अनेक धार्मिक संस्थानांच्या जमिनी लाटल्या त्यावरून वक्फ बोर्डाचा आणि हिंदूत्वाचा संबंध कसा येत नाही? वक्फ बोर्डाने मनमानी केली. मराठी माणसाच्या अनेक जमिनी लाटल्या. मुस्लिम लोकांच्या जमिनी सोडून हिंदू समाजाच्या जमिनी लाटण्याचे काम केले. संजय राऊत यांच्या बोलण्यावरून ते वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करतील असे दिसते. सभागृहात काय होते ते माहिती नाही. वॉकआऊट न करता या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपले असा त्याचा अर्थ होतो," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊतांना भाजपच्या भूमिकेचा कावीळ झाला आहे. मोदीजींचे नाव घेतल्यावर त्यांना पंडूरोग होतो आणि तो दुरुस्त होऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान १४० कोटी जनता ठरवते. देशाने २०२९ पर्यंत मोदीजींना पंतप्रधान म्हणून निवडले आहे आणि पुढच्या काळातसुद्धा मोदीजींच्या नेतृत्वात भारत समोर जाणार आहे. मोदीजींनी २०४७ च्या विकसित भारताचा संकल्प केला आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ दुरुस्ती विधेयकानंतर आता टार्गेट मशि‍दींचे भोंगे, किरीट सोमय्यांनी यादीच काढली

वक्फ दुरुस्ती विधेयकानंतर आता टार्गेट मशि‍दींचे भोंगे, किरीट सोमय्यांनी यादीच काढली

Kirit Somaiya भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारने वक्फनंतर आता मशि‍दींवरील भोंग्यावरून लक्ष्य केले आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्यावर भाष्य केले होते. ठरवून दिलेल्या नियमालीचे पालन करावे असा दावा फडणवीसांनी केला होता. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत भोंगे लावता येणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील भोंग्यांवर बंदी आणली आहे. अशातच आता राज्यातील मशि‍दींवर सुरू राहणाऱ्या भोंग्यांविरोधात राज्य सराकार पाऊल उचलत आहेत. ..

वक्फ दुरुस्ती विधेयकानंतर काँग्रेससह

वक्फ दुरुस्ती विधेयकानंतर काँग्रेससह 'या' पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान

Waqf Amendment Bill आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली आहे. त्यानंतर आता कायद्याची निर्मीती होणार असून लवकरच कायदा सुरू होणार आहे. मात्र, आता या कायद्याला काहींनी विरोध दर्शवला आहे. काही विरोधकांनी निषेध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेत विधेयकाला आव्हान दिले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते फयाज अहमद आणि खासदार मनोज झा यांनी सर्वोच्च न्यायालयात वक्फ विधेयकाविरोधात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वक्फ विधेयकामुळे मलमत्तांच्या व्यवस्थापानांवर मोठा परिणाम होईल असे बोलले जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121