देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात

- ‘महाज्ञानदीप’चा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

    19-Apr-2025
Total Views |
 
country first digital education portal in Maharashtra
 
मुंबई: ( country first digital education portal in Maharashtra ) “डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून ‘महाज्ञानदीप’या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे,” अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
 
मंत्रालयात ‘महाज्ञानदीप’ पोर्टलचा शुभारंभ मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात झाला. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’चे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक, पत्रकार आणि अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
 
“महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत 150 प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ अंतर्गत ‘भारतीय ज्ञान प्रणाली - जेनेरिक’ हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होईल,” अशी माहिती पाटील यांनी दिली.
 
या उपक्रमामध्ये ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’, ‘मुंबई विद्यापीठ’, ‘शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर’ आणि ‘एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई’ यांचा समावेश आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121