पाकिस्तानात 'ईशनिंदा'चा आरोप करत न्यायालयाने ख्रिश्चन व्यक्तीला मृत्युदंडाची सुनावली शिक्षा
19-Apr-2025
Total Views | 19
इस्लामाबाद : पाकिस्तानातील (Pakistan ish ninda) फैसलाबादमध्ये दहशतवाद विरोधी न्यायालयाने शुक्रवारी दंगलीतील एका आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या दंगलीत अनेक चर्च आणि ख्रिश्चनांची घरे जाळली गेली. अशातच संबंधित ख्रिस्ती व्यक्तीला १० वर्षांचा तुरूंगवास आणि एकूण ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. १६ ऑगस्ट २०२३ रोजी, पवित्र कुराणाच्या कथित अपवित्रतेच्या मुद्द्यावरून जरनवालात दंगल उसळली आणि जमावाने अनेक चर्च आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी घरे जाळली आहेत.
खटल्याच्या कामकाजाच्या अंतिम क्षणी, एटीएस न्यायाधीश जावेद इक्बाल शेखने पीपीएस कलमान्वये २९५ क अंतर्गत संबंधित आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पीपीसीच्या कलम २९५ - अ अंतर्गत दोषी व्यक्तीला १० वर्षांची शिक्षा आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तथापि, न्यायालयाने त्याच्या दोन सहआरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जराननावा घटनेनंतर, चौकशीदरम्यान, सिनेमा चौकातील त्यांच्या घराबाहेर पवित्र कुराणाची काही पाने आढळल्याने पोलिसांनी अमेर मसीह आणि उमेर रॉकी या दोन ख्रिश्चन बंधूना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान, आमेर आणि उमेर यांना निर्दोष घोषित करण्यात आले आणि एटीएसने त्यांना निर्दोष सोडले आहे.
नंतर पोलिसांनी आणखी एका संशयिताला आणि त्याच्या दोन कथित साथीदारांना आमेर आणि उमेर यांना त्यांच्या घराबाहेर पवित्र पाने फेकून खोट्या ईशनिंदेच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याबद्दस अटक करण्यात आली होती. दंगलीनंतर दाखल झालेल्या शेकडो संशयितांविरूद्ध अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत. अशातच बहुतेक संशयितांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यात आला आहे.