मुंबई : (Maharashtra State Film Awards)महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सिनेक्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान केला जातो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
यात यंदाचा 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२४' प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर 'स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२४' ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर जाहीर करण्यात आला आहे. 'व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२४' अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना यांना जाहीर झाला आहे. 'स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४' अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५' जाहीर करण्यात आला आहे.
शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाज डोम येथे पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करणारी एक्स पोस्ट शेअर करत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\