बुलढाणा : (Buldhana News) काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमधील नागरिकांची केसगळती झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे कायम वातावरण आहे. अशातच आता बुलढाण्यातील बोंडगावमध्ये नागरिकांच्या बोटांची नखंही गळायला लागली आहेत. त्यामुळे पुन्हा या सर्व गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमधील गावांमधील नागरिकांची केस गळती होऊन टक्कल पडल्याचा प्रकार ३ महिन्यांपासून सुरू आहे. आधी टक्कल व्हायरसने नागरिकांची चिंता वाढवली होती पण आता बोटाची नखें जायला लागल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नेमका काय प्रकार सुरु आहे? असा प्रश्न या गावकऱ्यांना पडला आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बनकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण २९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आले आहे. सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आहे. जे केस गळतीचे रुग्ण आहेत, त्यांच्यामध्ये सध्या नखं गळतीची समस्या जाणवत आहे."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\