वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

    17-Apr-2025
Total Views | 17

Waqf Act
लखनऊ (Waqf Act)  : संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात येत आहे.
वक्फ संशोधन विधेयक पारित झाल्यानंतर बरेलीत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशावेळी बरेलीतील एसएसपी आर्य म्हणाले की, जिल्ह्यतील सीबीगंज ठाण्यात बुधवारी १६ एप्रिल रोजी सब्जे महमुद अली नावाच्या एका कट्टरपंथी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर बनावट कागदपत्रे आणि अवैधपणे वापरण्यात आलेल्या कब्रस्तान असलेल्या जमिनीवर वक्फने अवैधपणे दावा करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. ही मालमत्ता महसूल नोंदींमध्ये सरकारी जमीन म्हणून नोंदवण्यात आली होती.
 
 
एसएसपीने सांगितले की, सब्जे महमूद अलीने सरकारी जमिनीवर असणाऱ्या कब्रस्तान असल्याचे सांगत अवैध जागेवर दावा केला, त्यानंतर सेंट्रल वक्फ बोर्ड लखनऊमध्ये नोंद केली. यानंतर त्याने आपल्या कुटुंबांना ट्रस्टचे सदस्य बनवले आणि स्वत: समितीचा अध्यक्ष झाला. न्यायालयाने या प्रकरणातील नाव नोंदणीत फसवणूक केल्याचे सांगितले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, पुत्तन जुल्फिकार शाह यांच्या तक्रारवर सब्जे अली आणि १० अन्य आरोपींविरूद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. त्यांच्यावर आईसीपी कलम ३२३, ५०४, ५०६, ४२०, ४६७, ४७१, ४४७ आणि १२० ब नुसार त्याचा अहवाल जारी करण्यात आला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121