"आम्ही रस्त्यावर आलो तर तुम्हाला चालता येणार नाही"; कट्टरपंथी मुस्लिम महिलेची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    16-Apr-2025
Total Views |

Waqf Amendment Act
 
नवी दिल्ली : वक्फ संशोधन कायदा २०२५ (Waqf Amendment Act) विरोधात कट्टरपंथी मुस्लिम महिलेने वादग्रस्त विधान केलेले आहे. जर आम्ही एकत्र आलो तर तुम्हाला उभे राहण्यासाठी जमीनच शिल्लक राहणार नाही. संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जगभरात सर्वाधिक मुस्लिमांची संख्या असल्याचा दावा तिने केला आहे.
 
या जगात मुस्लिमांहून अधिक कोणच नसल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. व्हिडिओमध्ये महिला म्हणाली की, जगभरातील इतर मुस्लिम एकजूट होत आहेत. जर आम्ही रस्त्यावर उभे राहिलो तर हिंदूंना चालण्यास रस्ता शिल्लक राहणार नाही. लवकरात लवकर आपण आपल्या वक्फ कायदा मागे घ्यावा, असे संबंधित मुस्लिम महिला म्हणाली आहे.
 
 
सांगण्यात येत आहे की, वक्फ संशोधन कायदा एप्रिल २०२५ मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्यामुळे वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणणे आणि मंडळात गैर-मुस्लिम सदस्यांचा समावेश करणे यासारख्या सुधारणा घडवून आणल्या जातात. काही मुस्लिम संघटनांनी आणि निदर्शकांनी हिंदूंवर निशाणा साधला आहे. मंदिर, हिंदूंच्या संपत्तीवर, वाहनांवर निशाणा साधण्यात येत आहे. तसेच बाप-लेकाची हत्या करण्यात आली होती.