घाऊक बाजाराचा महागाई निर्देशांक घटला, देशांतर्गत इंधनांच्या किंमती घटल्याचा परिणाम

केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून आकडेवारी प्रसिध्द

    15-Apr-2025
Total Views | 7
wholesale
 
नवी दिल्ली : देशातील मध्यमवर्गाला सुखावणारी एक माहिती नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीत मार्च महिन्यात देशातील घाऊक बाजाराचा महागाई निर्देशांक २.०५ टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात ही घसरण झाली आहे. या घसरणीमागे देशांतर्गत इंधनांच्या घसरलेल्या किंमती, अन्नधान्य, इलेक्ट्रिसिटी, कापड उद्योग या क्षेत्रांतील वस्तुंच्या घटलेल्या किंमती कारणीभूत आहेत. फेब्रुवारी महिन्यातील २.३८ टक्के वरुन ०.१९ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे.
 
केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून दर महिन्याला ही आकडेवारी प्रसिध्द केली जाते. या महिन्यातील आकडेवारीनुसार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील महागाई २.४२ टक्क्यांनी कमी झाली. खाद्यांनांच्या किंमतींत ०.७२ टक्क्यांची तर खाद्येतर पदार्थांच्या किंमतींत २.४२ टक्क्यांनी घट झाली. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई निर्देशांकात ०.९१ टक्क्यांची घट झाली. अशी जवळपास सर्वच महत्वाच्या क्षेत्रांत घट झाली आहे.
 
खाद्य पदार्थांमध्ये भाजीपाल्याच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे. डाळींच्या किंमतींमध्येही घट होऊन त्या उणे २.३८ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. अंडी, मांस, मासे यांच्या किंमतींतही ०.७१ टक्क्यांनी घट झाली आहे. या सर्वच बाबी वाढत्या महागाईपासून दिलासा देणाऱ्या आहेत. भारतातील खाद्यांन्नांच्या घाऊक बाजारातील किंमतींतील घट ५.९ टक्क्यांवरुन ४.७ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. हा सात महिन्यातील नीचांक आहे. मार्च महिन्यात पेट्रोल आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली घट या उतरलेल्या महागाई निर्देशांकांचे प्रमुख कारण आहे. यापुढेही काही महिने तरी हाच कल राहू शकतो असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
घाऊक किंमत निर्देशांक कसा मोजतात ?
 
घाऊक किंमत निर्देशांक हा देशातील प्रामुख्याने छोट्या किरकोळ वापराच्या वस्तुंपेक्षा, मोठ्या संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वस्तुंशी निगडीत आहे. यामधून लोकांचा वस्तु वापराचा कल कळतो. ज्यातून देशातील प्रमुख वस्तुंच्या किंमतीतील फरकाचे परिणाम तपासता येतात.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121