ममता बॅनर्जी ‘आधुनिक जिना’

- पश्चिम बंगालमध्ये ‘वक्फ’विरोधातील हिंसक आंदोलनात तिघांचा मृत्यू

    14-Apr-2025
Total Views | 12
 
Three killed in violent protests against Wakf in West Bengal
 
कोलकाता: ( Three killed in violent protests against Wakf in West Bengal ) “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ‘आधुनिक जिना’ म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते, आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालातील मुस्लीम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात,” अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी रविवार, दि. १३ एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
 
जिहाद्यांच्या या थैमानाला भाजप नेते तरुण चुघ यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या जबाबदार धरले आहे. त्यांना ‘आधुनिक जिना’ म्हणून फटकारले आणि “त्यांचा पक्ष हा मुस्लीम लीगसारखे काम करत आहे,” असा तिखट दावादेखील त्यांनी केला. “वक्फ बोर्डा’विरोधात निदर्शनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेवर ममता बॅनर्जी मूग गिळून गप्प बसल्या आहेत. त्यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद आहे. ममता सरकार हे मतांच्या तुष्टीकरणाच्या नावाखाली हिंदूंना लक्ष्य करत आहे,” असा आरोप तरुण चुघ यांनी केला आहे.
 
तरुण चुघ यांचा हल्लाबोल-
 
‘वक्फ कायद्या’विरोधात पश्चिम बंगालमध्ये जिहाद्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मुर्शिदाबादमध्ये हिंसक वळण लागले आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे. या हिंसक आंदोलनात आतापर्यंत तीनजणांचा मृत्यू झाला असून, ते तिघेही हिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.
 
संबंधित मृत्युमुखी असणारा युवक आणि त्याचे वडील हे धुलियानस्थित होते. हरगोबिंद दास (वडील) आणि चंदन दास (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. याच हिंसक परिस्थितीत सुमारे १५ पोलीस जखमी झाले आहेत. अनेक दुकानांना आग लावण्यात आली, वाहने जाळली आणि घरांची तोडफोड करत लूटमार करण्यात आली. ‘वक्फ सुधारित विधेयका’च्या निषेधार्थ राज्यात दि. १० एप्रिल रोजीपासून हिंसाचाराचे सत्र कायम आहे. त्याचाच विपरीत परिणाम पश्चिम बंगालवर झाला आहे.
 
केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त भागात 1 हजार, ६०० केंद्रीय दलांचे जवान तैनात केले आहेत. शिवाय, सुमारे ३०० ‘बीएसएफ’ सैनिकांचा फौजफाटा मुर्शिदाबादमध्ये दाखल करण्यात आला आहे. हिंसाचारग्रस्त भागात इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली आहे. हिंसाचार घडलेल्या भागात ‘कलम १४४ ’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच हिंसाचारात आतापर्यंत तब्बल १५० निदर्शकांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121