गडचिरोली जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गडचिरोलीत विकासकामे

    14-Apr-2025
Total Views | 6

gaurdian minister devendra fadnavis

मुंबई, दि.७ : विशेष प्रतिनिधी 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्हा रेल्वे मार्गाने जोडला जाणार आहे.

पायाभूत सुविधांचा विकास

२०२३-२४च्या आकडेवारीनुसार, गडचिरोलीतील एकूण रस्त्यांची लांबी ६१२१ किलोमीटर इतकी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा नागपूरपुढे विस्तारत असून राज्य सरकारने भंडारा- गडचिरोली प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग उभारणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत १२,५८६.६२ कोटी रुपये पूर्णत्वाचे अपेक्षित वर्ष २०२७- २८ आहे. गुंतवणूक वाढविण्यासाठी, महाराष्ट्र सरकार गडचिरोली येथे विमानतळ बांधण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. समुद्धी महामार्गाचा विस्तार करण्याव्यतिरिक्त, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) छत्तीसगडमधील दुर्ग ते हैदराबादपर्यंतचा रस्ता तयार करण्याची योजना आखली आहे, जो गडचिरोलीतून जाईल. यसोबतच गडचिरोलीला पोर्टशी कनेक्ट करून शिपिंगचे काम सुरू करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व

मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी गडचिरोलीच्या अशा भागांना भेट दिली होती जिथे यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नव्हती. त्यावेळी गडचिरोलीत रात्री थांबणारे ते पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता त्यांच्या दुसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारत गडचिरोलीच्या विकासाला दिशा देण्याचा विडा उचलला. अगदी पहिल्या दिवसापासूनच गडचिरोलीत उद्योग, रस्ते आणि रेल्वे, परिवहन सुविधांची पायाभरणी त्यांनी केली. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वार्षिक जागतिक आर्थिक मंचात (WEF) मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीप्रती असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित करत स्वाक्षरी केलेला पहिला करार हा गडचिरोलीमध्ये गुंतवणूक वचनबद्धतेसाठी होता.

रेल्वे नेटवर्क

भविष्यात गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळण्याची शक्यता असल्याने रेल्वे मार्गाचे जाळे तयार करण्यावर भर दिला जात आहे. लवकरच गडचिरोली-वडसा या ५२ किमी या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प गडचिरोली या नक्षल प्रभावी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा क्रांतिकारी ठरणार आहे. यामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्हा रेल्वेमार्गाने व्यापला जाईल. गडचिरोली जिल्हा माहिती संकेतस्थळावरील माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात एकच १८.४८ कि.मी. चा रेल्वे मार्ग आहे. गडचिरोली शहर हे रेल्वेने जोडलेले नसून जिल्ह्यातील देसाईगंज या शहरात रेल्वे स्टेशन आहे.
नक्षलवाद भूतकाळ जमा होणार

गडचिरोली जिल्ह्याचे पूर्ण परिवर्तन व्हावे यासाठी मागील दहा वर्षापासून देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी तरुणांना पोलीस सेवेत सहभागी करून नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी स्थानिक पातळीवर सशक्त फळी निर्माण करण्यात आली. तसेच नक्षलवाद्यांना समर्पित करण्यास भाग पाडून त्यांना नोकरी किंवा उदरनिर्वाहासाठी रोजगार उपलब्ध करून दिला. आत्मसमर्पण धोरण प्रभावीपणे राबवून या लोकांना मुख्य प्रवाहात आणले गेले.

प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग १
प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गची लांबी ५० किमी
राज्य महामार्ग १२२० किमी
इतर जिल्हा मार्ग १३७८ किमी
ग्राम रस्ते ३८३४.८०० किमी
नदीवरील एकूण पुलांची संख्या २४४
एकूण बस आगार २ ( गडचिरोली, अहेरी )
रा.पं.महामंडळव्दारे जोडलेली गाव २७१
एकूण रेल्वे रस्ता १८.४८ किमी
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121