वक्फ सुधारित विधेयकाची कमाल, प्रशासनाच्या कारवाईआधीच मध्य प्रदेशात संचालकाचा मदरसावर हातोडा
13-Apr-2025
Total Views | 19
भोपाळ : वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) पारित केल्यानंतर देशभारतील मुस्लिमांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. तसेच विरोधकांनी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. मात्र या विधेयकामुळे काही चांगल्या बाबी घडू लागल्या आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना येथील अवैध जमिनीवर बांधण्यात आलेल्या मदरशांवर प्रशासनाने कारवाई करण्याआधीच हातोडा घालण्यात आला. संबंधित मदरशावर आज ना उद्या सरकारने पाडण्याचा निर्णय निश्चित केला होता.
सरकारी जमिनीवर उभारण्यात येणारी अवैध मदरशाविरोधात मुस्लिमांनी आवाज उठवला आणि संबंधित प्रकरणावर तक्रार दाखल केली. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर खरी माहिती समोर आली आहे.
यावेळी लोकांनी सांगितले की, अब्दुल रऊफ कादरी हा परकीय व्यक्ती आहे. तो गेल्या १० वर्षांपासून आला होता. त्याने सांगितले की, सरकारी जमिनीवर दावा ठोकत अवैध मदरसा बांधण्यात आला. गरीब मुलांच्या नावाखाली त्याने वर्गणी मागत अनेकांकडून पैसे उकळले. ही सत्यता या प्रकरणातून समोर आली आहे.
त्यानंतर एसडीएमने मदरसा संचालकाला नोटीस जारी केली आणि एसडीएम संजय नागवंशीने माहिती दिली की, सरकारी जमिनीवर अवैधपणे मदरशाचे बांधकाम करण्यावरून तक्रार दाखल करण्यात आली. तसेच संबंधित तक्रारीची दखलही घेण्यात आली असून तहसीलदाराच्या नेतृत्वातच पोलिसांच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली.
अशातच, प्रशासनाने मदरशावर अॅक्शन घेण्याआधीच स्वत: मदरशा पाडण्याचे काम केले आहे. देशात वक्फचा कायदा बनल्यानंतरचे हे सकरात्मक चित्र आहे. अशा अनेक अवैध मदरसा, अवैध मशीद आणि इमारतींवर कारवाईचे आदेश दिले जाणार आहेत. दरम्यान, मदरशाला जमीनदोस्त करण्यात आले खरं, पण मदरशात शिकवणीस येणाऱ्यांकडून पैसे उकळले गेले त्याचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.