मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

    13-Apr-2025
Total Views | 32

Hanuman Jayanti
भोपाळ : मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथील असणाऱ्या मशिदीसमोर घडली. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी सध्या शांततेचे वातावरण आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक मान सिंह ठाकुरने सांगितले की, पोलिसांनी अन्य आरोपींची माहिती मिळवत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिरवणूक मशि‍दीच्या समोरून जात असताना कट्टरपंथीयांनी दगडफेक केली. गुनाचे जिल्हाधिकारी किशोर कन्यालने सांगितले की, दोन्ही गटांमध्ये समजोता झाला नसल्याने दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यांनी दगडफेक केली.
त्यांनी सांगितले की, हनुमान जयंती दिवशी मिरवणूक काढण्याची परवानगी दिली जात नव्हती. कार्यक्रमाच्या आयोजक असणाऱ्यांमध्ये एकाने सांगितले की, याबाबत कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांनी दावा केला की, ज्यावेळी लोकांनी जय श्रीराम अशा घोषणाबाजी केल्या त्यावेळी काहींनी दगडफेक करत अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या होत्या.
पोलीस अधीक्षक संजीव सिन्हा यांनी सांगितले की, शनिवारी रात्री ७ वाजून ४५ मिनिटांदरम्यान जमावाने मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यांनी सांगितले की, टेकरी धाम येथे तैनात असलेले पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नगरसेवकाने तक्रार दाखल केली त्याआधारे गुन्दा दाखल करण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्यात १५ ते २० जण अज्ञातांचा यामध्ये समावेश आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121