"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे
13-Apr-2025
Total Views | 52
हैदराबाद : एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिलने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
मसूद म्हणाले की, जर मशीद नसेल तर नमाज कुठे पडणार? मरणानंतर प्रेत कुठे दफन करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर एकच पर्याय आपला पक्ष सत्तेत येणे गरजेचे आहे. एका तासात कसा बदल करायचा हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. ज्या दिवशी सत्तेत येऊ त्या दिवशी कायद्यात नक्कीच बदल करणार असल्याचे वक्तव्य मसूद यांनी केले आहे.
इम्रान मसूद म्हणाले की, समुद्रात अनेक वादळे येतात आणि जेव्हा वादळ येते तेव्हा मोठी जहाजे वादळाचा सामना करतील, पण त्याचा सामना बोटींना करता येत नाही. माझे तुम्हाला सांगणे आहे की, बोट चालवण्याऐवजी जहाज चालवा. यासाठी आता एकच मार्ग आहे काँग्रेसला निवडून द्या, आम्ही वचन देतो की आम्ही सत्तेत आल्यावर वक्फ कायद्यात बदल करून दाखवू.
व्होट बँक वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा खोटे गोडवा
यावेळी बोलताना मसूदने व्होट बँक वाचवण्यासाठी धर्मनिरपिक्षतेचा खोटा गोडवा गायला. मुर्शिदाबादमध्ये झालेला हिंसाचार हा चुकीचाच आहे. या देशात हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन भावासारखे राहतात असे म्हणत मसूदने धर्मनिरपेक्षतेचे खोटे गोडवे गायले आहे.
त्यानंतर त्यांनी मुर्शिदाबादमधील हिंसाचारावर भाष्य केले. हा लढा मुस्लिमांचा नसून देशाचा असल्याचे वक्तव्य त्याने केले. अनेकदा घटना बदलण्याचा प्रयत्न केलेल्या काँग्रेसच्या मसूदने भाजपने संविधान पायदळी तुडवल्याचा दावा करत अकलेचे तारे तोडले आहेत. एवढेच नाहीतर त्याने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारहाणीची धमकी दिली होती.