१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

    12-Apr-2025   
Total Views | 16

tahawwur rana kept in highly secure nia cell
 
 
 
नवी दिल्ली: (Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आणि २४ तास सुरक्षारक्षकांनी तैनात केले आहेत.
 
हा कक्ष सीजीओ कॉम्प्लेक्समधील एनआयए इमारतीच्या तळमजल्यावर आहे, जे तहव्वूर राणाच्या आगमनापासून किल्ल्यात रूपांतरित झाले आहे. बाहेर अतिरिक्त दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही, अगदी मीडिया कर्मचाऱ्यांनाही परवानगी नाही. राणाच्या कक्षात बहुस्तरीय डिजिटल सुरक्षा व्यवस्था बसवण्यात आली आहे. प्रत्येक इंचावर सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवतात आणि फक्त १२ नियुक्त एनआयए अधिकाऱ्यांनाच कक्षात प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे.
 
कक्षातच त्याला पलंग आणि बाथरूमची सोय करुन दिली आहे, जेणेकरुन त्याच्या हालचालींवर मर्यादित ठेवता येतील. या व्यतिरिक्त जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा यांसारख्या इतर सर्व मूलभूत सुविधा देखील त्याला आत पुरवल्या जातील.
त्यांची चौकशी कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली केली जाईल. ब्रेक दिले जातील, परंतु अन्यथा, त्यांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, त्यांचे जबाब नोंदवले जातील. माध्यमांमधील माहितीनुसार, आठ केंद्रीय तपास आणि गुप्तचर संस्थांनी राणाच्या चौकशीसाठी परवानगी मागितली आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121