‘उबाठा’ गटात सहाव्या सचिवाची नियुक्ती; सुधीर साळवी यांच्या गळ्यात माळ, विनायक राऊत आणि आदेश बांदेकरांचे पंख छाटले

    12-Apr-2025
Total Views | 105

Sudhir Salvi
 
मुंबई : पक्षांतर्गत नियोजन शून्य, पण चमकोगिरी अधिक करणाऱ्या माजी खा. विनायक राऊत आणि आदेश बांदेकर यांचे पंख छाटण्यात आले आहेत. ‘उबाठा’ गटात सहाव्या सचिवाची नियुक्ती करीत, प्रस्तापितांना सूचक इशारा देण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या गळ्यात सचिव पदाची माळ घालण्यात आली आहे.
 
शिवसेना फुटीनंतर मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदेश बांदकर, अनिल देसाई आणि साईनाथ दुर्गे हे पाचही सचिव उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे ‘उबाठा’ गटात त्यांचा मान वाढला. अशावेळी पडत्या काळात नियोजबद्धरित्या पक्षविस्ताराची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, त्यात ते कमी पडले. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर विनायक राऊतांचा पक्षांतर्गत दबदबा कमी झाला. सिद्धिविनायक मंदिरातील गैरव्यवहाराचे प्रकरण विधानसभेत चर्चेला आल्यापासून आदेश बांदेकर शांत झाले. मिलिंद नार्वेकरांना आमदार करून पक्षप्रमुखांनी जाणिवपूर्वक दूर केले. साईनाथ दुर्गेंना आदित्य ठाकरेंच्या मागे फिरताना वेळ कमी पडू लागला, तर खा. अनिल देसाई मतदारसंघात व्यस्त झाले.
 
त्यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणूक लक्षात घेऊन अतिरिक्त (सहावा) सचिव नेमण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत साळवी यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांना माघार घ्यावी लागली. त्यावेळेस त्यांना मोठ्या पदाचा शब्द देण्यात आला होता. ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळामुळे सुधीर साळवी यांच्याभोवती एक वलय निर्माण झाले आहे. त्याचा फायदा पालिका निवडणुकीत करून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, पक्षाची पूर्णतः पडझड झाली असताना, साळवी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 
 
सुधीर साळवी कोण?
 
सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळात गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. २० वर्षांपासून सातत्याने या मंडळाचे मानद सचिव म्हणून ते नेतृत्व करीत आहेत. महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ग्लेनईगल्स रुग्णालयाचे विश्वस्त म्हणून ते काम सांभाळतात.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121