वक्फ सुधारणा विधेयकावरून कट्टरपंथीयांनी पोलिसांवर केली दगडफेक, रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न
12-Apr-2025
Total Views | 37
कोलकाता (Waqf Amendment Bill) : प.बंगालमध्ये काही ठिकाणी शुक्रवारी ११ एप्रिल २०२५ रोजी जुम्म्यासाठी एकत्र झालेल्या कट्टरपंथी मुस्लिमांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा निषेध करत दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी वाहने जाळल्याचे हैवानी कृत्य केले आहे. त्यानंतर निदर्शने करणाऱ्यांनी रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच वाहतूकही बंद पाडण्याचे काम आता निदर्शकांनी केले. रस्त्यावर पांगलेल्या जमावाला शांत करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर कट्टरपंथीयांनी पोलिसांवर दगडफेक केली,यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितले की, मुर्शिदाबादमध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली होती. निषेध केल्यानंतर विरोधक जमा झाले आणि रस्ता जाम करण्यात आला. प्रदर्शन करणाऱ्यांनी सुरक्षारक्षकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांच्या व्हॅनला आणि सार्वजनिक बसला आग लावण्यात आली होती.
Murshidabad in West Bengal a while ago. Supposed protest against Waqf Law. Vandalism, arson, attack on police. Such rioting continues despite the CMs reassurances of protection to the Muslim community pic.twitter.com/mRaqy80G6u
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी जुम्म्याची नमाज अदा करण्यात आली त्यानंतर सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यांनी शमशेरगंजमध्ये डाकबंगला ते सुतिर सजुरपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग-१२ चा एक मार्ग बंद करण्यात आला. ते म्हणाले की, निदर्शने करणाऱ्यांनी हिंसक मार्ग स्वीकारत पोलिसांच्या व्हॅनवरती दगडफेक केली होती. यावेळी पोलीस आणि निदर्शने करणाऱ्यांमध्ये धरपकड झाल्याचे चित्र दिसून आले. ज्यात लगभग १० पोलीस जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, निदर्शने करणाऱ्या पोलिसांनी काही स्फोटके फेकली होती. त्यानंतर संबंधित परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरूवात केली. त्यानंतर एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, काही पोलीस कर्मचारी मशिदीत जाऊन लपल्याचे सांगण्यात येत आहे.