बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा! बीडमध्ये ५० जणांवर गुन्हा दाखल
12-Apr-2025
Total Views | 25
बीड : बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी बीड येथे तब्बल ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
बीड येथे बनावटी दस्तावेजद्वारा जन्म प्रमाणपत्र मिळविले असल्याची तक्रार किरीट सोमया यांनी केली होती. त्यानंतर या प्रकणाची चौकशी करण्यात आली. दरम्यान, आता इकबाल मुन्शी कुरेशी, फेमुन्निसा बेगम मैनोदीन शेख यांच्यासह एकूण ५० लोकांवर भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ४२०, ४६८, ४७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन महिन्यात १८ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.