"रोज सामनाच्या अग्रलेखात आणि ट्विटरवर..."; केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर घणाघात
12-Apr-2025
Total Views | 26
मुंबई : रोज सामनाच्या अग्रलेखात आणि ट्विटरवर चवताळून भाजपचे नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केला आहे. संजय राऊत यांनी सुनैना होले नामक ट्विटर युजरच्या पोस्टला उत्तर देताना संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती. यावर आता केशव उपाध्ये यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "संजय राऊत यांना सांगावं की, तुम्हाला त्रास होणं म्हणजेच आमचं बरोबर चालणं आहे. चिडतोय कोण? आम्ही की तुम्ही? कारण रोज सामनाच्या अग्रलेखात आणि ट्विटरवर चवताळून भाजपचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही. पण cool cool. तुम्हाला तव्ववूर राणासारख्या मुंबईला काळा दिवस दाखवणाऱ्याबद्दल अचानक एवढं प्रेम का उफाळून येत आहे? त्याला पकडून आणलं याचं तुम्हाला दुःख होतं आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "आज तव्ववूर राणा फेस्टिवल असा उल्लेख करून पुन्हा एकदा तुम्हाला बोलण्याची किती जाण आहे दाखवून दिलेलं आहे. जनता मूर्ख नाही, म्हणूनच तुमच्या गप्पा, आरोप आणि नाटकी पत्रकारितेला ती नाकारते. बीजेपीचा फेस्टिवल नाही, तर विकासाचं युग सुरू आहे आणि तुमच्या टोमण्यांमुळेच तो अधोरेखित होतोय. तुम्हाला हे बोलताना लाज कशी वाटली नाही याचंच आश्चर्य वाटतंय," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केली आहे.