भारतीय बँकिंग क्षेत्र सुस्थितीत, निफ्टी निर्देशांकात ९ टक्क्यांची वाढ
भारतातील सर्वच प्रमुख बँकांच्या शेअर्समध्ये वाढ
12-Apr-2025
Total Views | 6
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा असलेले बँकिंग क्षेत्राने जबरदस्त कामगिरी नोंदवली आहे. सध्या सुरु असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथींमध्येही भारतीय बँकांची ही कामगिरी भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती दाखवते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे एनएसईमध्ये भारतीय बँकांच्या शेअर्स मुल्य ९ टक्क्यांनी वधारले आहे.
भारतीय बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने एनएसईमधील बँकिंग क्षेत्राच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात १२-१३ टक्के वाढ अपेक्षित आहे. फक्त बँकिंग क्षेत्रच नव्हे तर बिगर बँकिंग क्षेत्रातील संस्थांसुध्दा आढावा घेण्यात आला आहे. यातून लक्षात येते की आर्थिक पुरवठा करणाऱ्या सर्वच वित्तीय संस्थांचा आलेख हा चढाच आहे. यामधील सर्वात प्रमुख बाब म्हणजे जागतिक पातळीवर तयार झालेल्या आर्थिक अस्थैर्याच्या काळात भारतीय बँका आणि बिगर बँकिग संस्था या भारतातील उद्योग क्षेत्राला पतपुरवठा करण्याची क्षमता टिकवून आहेत.
बाजारमूल्यानुसार देशातील पहिल्या दहा बँका
यासाठी भारतातील प्रमुख बँकांचे बाजारमुल्य तपासून बघणे गरजेचे आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी बँकेचे बाजारमुल्य सर्वात जास्त म्हणजे १३.८१ टक्के इतके आहे. त्यानंतर आयसीआयसीआयचे बाजारमुल्य ९.४३ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजारमुल्य ६.८१ टक्के, कोटक महिंद्रा बँकेचे मुल्य ४.२६ टक्के, अॅक्सिस बँकेचे मुल्य ३.३९ टक्के, पंजाब नॅशनल बँकेचे मुल्य १.०६ टक्के, युनीयन बँक ऑफ इंडिया ०.९१ टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकेचे मुल्य ०.८० टक्के, कॅनरा बँकेचे मुल्य ०.७९ टक्के इतके आहे.
देशातील बँकिंग क्षेत्राचा एकूण वित्तपुरवठ्यातील वाटा
देशातील बँकिग क्षेत्राचा एकूण अर्थपुरवठ्यातील वाटा वाढतो आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या संस्थांकडून किती टक्के पतपुरवठा झाला त्याचा आढावा घेतला गेला आहे. यामध्ये सरकारी मालकीच्या बँकांचा वाटा हा ९.८३ टक्के इतका आहे. त्यानंतर देशातील खासगी क्षेत्रातील बँकांचा वाटा १७.२१ टक्के, परदेशी बँकांचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ३७.७० टक्के इतका आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो छोट्या पतपुरवठा करणाऱ्या बँकांचा. त्यांचा वाटा ३५.२४ टक्के इतका आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्राचे बाजारमुल्य सातत्याने वाढते आहे. याचाच अर्थ म्हणजे बँकांची कर्ज देण्याची क्षमता देखील वाढती आहे. ट्रम्प यांच्याकडून लादलेल्या आयातशुल्कामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली असली तरी सक्षम भारतीय बँकिंग क्षेत्रामुळे भारत त्यातून सहीसलामत बाहेर पडू शकतो हे लक्षात येते.