नोकरी आणि पैशाचे आमिष दाखवत आझमगडमध्ये ख्रिस्ती धर्मांतराचे षडयंत्र, पोलिसांनी केला पर्दाफाश

    12-Apr-2025
Total Views | 8

ख्रिस्ती धर्मांतर
लखनऊ : उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये धर्मांतराचा पोलिसांनी १० एप्रिल २०२५ रोजी पर्दाफाश केला आहे. नोकरी आणि पैशाचे आमिष दाखवत हिंदूंना ख्रिस्ती धर्मांतराचे रॅकेट समोर आले. धर्मांतराची क्रिया सुरू असलेल्या घरात ३० हून अधिक पुरुष आणि महिला जमल्याची माहिती आहे. पोलिसांनी सुरू असणाऱ्या धर्मांतराचा प्रकार सुरू असणाऱ्या घराचे मालक गुलाबचंद आणि त्याची पत्नी बंदेयी यांना अटक करण्यात आली आहे.
या धर्मांतराच्या कार्यात बाहेरील लोकांचाही त्यात समावेश असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. स्थानिकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवत त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. त्यांना हिंदू देवतांची पूजा करू नये असे सांगण्यात येत होते. धर्मांतराचा हा प्रकार बऱ्याच काळापासून सुरू असल्याचे वृत्त आहे. स्थानिक हॅप्पी सिंग नावाच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर या संबंधित धर्मांतराच्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी घरी पोहोचून बायबल आणि काही पत्रके जमा करत जप्त करण्यात आली. धर्मांतराचे रॅकेट चालवणाऱ्या जोडप्यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि पतीला चौकशीसाठी दाखल करण्यात आले.
 
 
संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली. एका प्रसारमाध्यमाला देण्यात आलेल्या एफआरआयनुसार सांगितले की, हॅपी सिंग यांनी आरोप केला की, १० एप्रिल रोजी गुलाबचंद घरी एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. तो त्याचा मित्र अभिषेकसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना समजले की, सुमारे २० पुरुष आणि महिला तिथे जमले होते आणि त्यांना बंदेई ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगत होते. त्यांना अंद्धश्रद्धा आणि पैशाचे आमिष दाखवत त्यांना आकर्षित केले जात होते.
त्यानंतर तक्रारदार आणि त्याचा मित्र अभिषेकने याचा तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सांगितले आणि शांत बसण्यास लाच दिली. त्यानंतर तक्रारदार सिंग आणि अभिषेक घटनास्थळावरून निघून गेले असून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. उत्तर प्रदेश अवैध धर्मांतरण प्रतिबंधक धर्मांकर कायदा, २०२१ कलम ३, ५ (१) आणि बीएनएसएसच्या कलम ३५१ (३) अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121