अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
12-Apr-2025
Total Views | 20
जयपूर (Bangladeshi) : राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडण्यात आले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याचा बोजाबिस्तारा आवरण्यास सांगितला.
पोलीस उपअधीक्षक आणि एसटीएफचे प्रभारी लक्ष्मणराम चौधरी म्हणाले की, शहरात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी-रोहिंग्या नागरिकांविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमेत, विशेष कार्य दलाने शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी केली. या पोलीस चौकशीत त्याने आपण बांगलादेशी असल्याचे कबूल केले. चौकशीदरम्यान, त्याने स्वतःची ओळख मोहम्मद शाहिद अशी सांगितलेी होती. जो बांगलादेशातील निफामारी सैदपूरमधील रहिवासी अली मोहम्मदचा मुलगा आहे.
शाहिदने सांगितले की, वय वर्षे १६ असताना त्याने अवैधपणे भारत-बांग्लादेश हिली सीमा ओलांडली आणि गुप्तपणे पायी प्रवेश केला. भारतीय सीमेवरून प्रवेश केल्यानंतर प.बंगालमधील मालदेत पोहोचले. काही काळ भटक्या जीवन जगल्यानंतर, मी रेल्वेने नवी दिल्लीला गेलो. दिल्लीत काही दिवस घालवले आणि त्यानंतर अजमेर शरीफला गेलो. तेव्हापासून तो येथे भटकंती इकडून तिकडे भटकत जीवन जगत आहेत.
सीओ लक्ष्मणराम चौधरी म्हणाले की, दर्ग्याच्या आत कोट परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून शोध मोहिम सुरू करण्यात आली. दर्गा परिसर, जालियन कब्रस्तान, अंदरकोट, न्यू रोड, तारागढ हिल, सोलबखांब दर्गा आणि बडे पीर या परिसरातील संभाव्य भागात वास्तव्य करणऱ्या संशयीतांची चौकशी केल्यानंतर आणि जर ते घुसखोर असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना बेदखल करण्याची कारवाई सुरू केली जात होती.