मुलींच्या सुरक्षेसाठी समाजाने सजग होणे गरजेचे : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बारामती आत्महत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी

    11-Apr-2025
Total Views | 6
 
Neelam Gorhe
 
पुणे : मुलींच्या सुरक्षेसाठी समाजाने सजग होणे गरजेचे असून बारामती येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवार, ११ एप्रिल रोजी केले.
 
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील एका तरुणाकडून सातत्याने होणारा मानसिक त्रास शाळकरी मुलीला सहन न झाल्यामुळे तिने आत्महत्या केली. हे वृत्त समोर आल्यानंतर अत्यंत खेद वाटतो. आजही आपल्या समाजात अशा घटनांमुळे अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरणात जगता येत नसून ही बाब अतिशय गंभीर आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीची भूमिका बजावली पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
 
हे वाचलंत का? -  तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी राज्य सरकारला तिसरा अहवाल सादर!
 
११२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा
 
"मुलींना कोणताही त्रास, छेडछाड अथवा धमकी दिली जात असेल, तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता ११२ या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. तसेच स्त्री आधार केंद्र यासारख्या महिला सहायता संस्थांकडे संपर्क साधून मदत घेता येईल. मुलींच्या वागण्यात कोणतेही भावनिक वा मानसिक बदल जाणवले तर त्याकडे पालकांनी दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधावा. सुरक्षितता, भावनिक आधार आणि समजूतदारपणाची गरज असलेल्या अशा प्रसंगांमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते," असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
 
"शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण, स्वसंरक्षण, कायदेशीर हक्क आणि मदत केंद्रांची माहिती देणारे कार्यक्रम नियमितपणे राबवावे. समाजानेही अशा घटना रोखण्यासाठी एकत्र येऊन सतर्कता बाळगली पाहिजे. आपल्या परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली जाणवल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. समाजात अशा अमानुष वागणुकीला थारा नाही. अल्पवयीन मुलींना सुरक्षित, सन्मानजनक आणि निर्भय आयुष्य मिळावं ही आपली जबाबदारी आहे," असेही डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121