चिपी विमानतळावरुन आता ‘इंडिगो’ची भरारी- खा. नारायण राणे; १ मे रोजी राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
11-Apr-2025
Total Views | 13
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवाईमार्गे देशातील वेगवेगळ्या ठिकाणांना जोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिपी विमानतळावरुन आता इंडिगोची विमानसेवा सुरू केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थिती चिपी विमानतळ बंद होणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी दिली.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या नव्याने उभारला जात आहे. या ६० फूट उंच पुतळ्याचे दि. १ मे रोजी अनावरण होईल, अशा प्रकारे नियोजन करून काम सुरू झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ६० टक्के काम झाल्याची माहिती मिळाल्याचे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर तोफ डागताना ते म्हणाले, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कोकणाला त्यांनी काहीही दिले नाही. अडीच वर्षांत त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पहा. त्यामुळे त्यांना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार नाही. कोकणात येण्याचाही त्यांना अधिकार नाही. ते ज्या दिवशी येतील, त्या दिवशी कोंबडी, मासे आणि वडे बंद ठेवा, असा आदेश नारायण राणे यांनी हॉटेल व्यवसायिकांना दिला.