मृत्यूचे रहस्य

    10-Apr-2025
Total Views | 17
 
mystery of death
 
ज्या योग्यांची साधना अपूर्ण राहिली आहे, असे योगी आपले मरण टाळून तो देह पुन्हा प्रवासाला योग्य करतात. त्या गूढ साधनेला ‘कायाकल्प’ म्हणतात. सुयोग्य औषधी वा प्राणायामाद्वारे कायाकल्प केला जाऊ शकतो. हठयोगी आपल्या पोटातील आतडी उलट मार्गाने बाहेर काढून, ती पाण्याने धुवून परत पोटात ढकलतात. अशा तर्‍हेने शरीर शुद्ध व तरुण करून ते आपली जीवनयात्रा पुन्हा वाढवतात. जीवनाचे साध्य साधल्यावर ते परत जातात. संत ज्ञानेश्वरकालीन चांगदेव अशा रितीने 1 हजार, 400 वर्षे जगले असे म्हणतात. मृत्यूनंतर केव्हातरी पुनर्जन्म घेऊन बाल्यकाळ, तारुण्यात व्यर्थ काळ घालवून मग साधना करण्यापेक्षा, ते त्यांच्या जीवनातील वरील कालखंड न मरण्याने वाचवतात व त्यात अनेक साधना करून, जीवन अधिक उन्नत करतात.
 
असे लोक साधारणतः हठयोगीच असतात. अनेक गहनसिद्धी संपादन करण्याकडे त्यांच्या मनाचा कल असतो, आत्मरुप जाणण्याची त्यांना ओढ नसते. 1 हजार, 400 वर्षे जगून सर्व सिद्धी प्राप्त करणार्‍या चांगदेवांना, शेवटी 14 वर्षांच्या मुक्ताईलाच गुरू मानून शरण जावे लागले तेव्हा कोठे ते खर्‍या मार्गाला लागले. पण एवढे मात्र खरे, की अशा तर्‍हेने जटिल योगसाधना करून आयुष्य वाढवता येते.
 
शरीर आहे, त्या अर्थी मृत्यू हा येणारच. ‘शीर्यते प्रतिक्षणं शरीरम्’ म्हणजे जे प्रतिक्षणाला नष्ट होते, त्याला ‘शरीर’ असे म्हणतात. अशा रितीने दर क्षणाला मरणार्‍या शरीराला आपण भावनेने तेच समजतो व काही काळ जिवंत ठेवतो, ही मायाच नाही काय? अशी दीर्घकाल शरीरे टिकविणार्‍या माणसांनासुद्धा मरण आहेच. शरीर टिकवायचे तरी किती आणि कशाला? जगण्याकरता जगणे हे ध्येय असू शकत नाही, जगण्यामागे एक हेतू असतो. भगवान वेदव्यास चिरंजीवी आहेत, असे मानण्यात येते. पण जगण्या-मरण्याचा अर्थ, व्यक्तिपरत्वे भिन्न राहू शकतो.
 
जडशरीराने जिवंत राहणे हा जिवंत राहण्याचा अर्थ व्यासांना मान्य नसल्यास, आमच्या जडदृष्टीने ते मर्त्यच असतील. साधारण माणूस आपले संस्कार वा आपला अर्थ महापुरुषांच्या जीवनाबाबत लावून, चुकीचे सिद्धांत मांडतात. व्यास चिरंजीवी जडार्थाने नव्हे, तर दिव्य अर्थाने आहेत. प्रत्येक महापुरुष या अर्थानेच चिरंजीवी आहे. ज्या महापुरुषांनी खर्‍या अर्थाने जगाला योग्य मार्ग दाखवला आहे, ते चिरंजीवीच होत. त्यांचे जडशरीर जिवंत असण्याचा आग्रह धरणे, हे अज्ञानाचे लक्षण आहे. शरीर हे कार्याचे उपकरण आहे, सर्वस्व नव्हे!
 
विस्मरण म्हणजे मृत्यू होय. साधारण माणसाला मृत्यूच्या यातनेमुळे मरणसमयी व मरणानंतरच्या अति वेगवान प्रवासामुळे (प्र + एत = प्रेत) ग्लानी येते. त्यामुळे त्याची दिव्य ज्ञानेंद्रिये त्या विलक्षण वेगामुळे बधीर होऊन अकार्यक्षम राहतात. म्हणून साधारण माणसाला, मृत्यूसमयीचे दिव्य अनुभव जाणीवपूर्वक घेता येत नाहीत. त्यामुळे साधारण माणूस अज्ञानात मरतो, अज्ञानातच मृत्यूपलीकडील प्रवास करतो व त्या अज्ञानमूलक संस्कारामुळे अज्ञानातच जन्म घेतो. एकदा अज्ञानाची शृंखला सुरू झाली, की ती शेवटपर्यंत टिकते. ज्ञान प्राप्त करण्याचा सोयीस्कर सर्वमान्य काल जडशरीरात असेपर्यंतच असतो. बहुतेक व्यक्ती त्या मानवजीवनाचा उपयोग धन, मान, दंभ, कीर्ती, राजकारण, अभिलाषा, मोहमाया व गुंडगिरी करण्याकरिता करीत असल्यामुळे, असल्या लोकांना जीवनाचे रहस्य कळतच नसते. जन्मामागे जन्म- मृत्यूमागे मृत्यू येतात, जीवनाचा फेरा पुनःपुन्हा चालू असतो, पण सर्व अज्ञानात चालत राहाते.
 
सावध साधक मात्र जन्म-मृत्यूचे रहस्य जाणून, वैचारिकदृष्ट्या तरी या चक्रव्यूहातून मुक्त होऊ शकतो. काही वैज्ञानिक वा डॉक्टर मृत्यू येण्याची कारणे केवळ शरीरातील आम्ले, रस, मज्जा, रोग इत्यादी शारीरिक असमानतेत पाहतात आणि तशी ती त्यांना सापडतातही. परंतु, मृत्यूचे कारण त्यातच असते, असे नाही. जीवात्म्याची जाण्याची वेळ आली की, वरील शारीरिक बिघाड उत्पन्न होऊ शकतात. शारीरिक बिघाडामुळे जीवात्मा जातो म्हणावे, तर अतिशय विकृत स्वरुपात शरीरातील घडामोडी चालू असतानासुद्धा, काही जीव कुडी सोडीत नाहीत. यावरून जगण्या-मरण्याची प्रबळ इच्छाच शरीरत्यागाच्या मुळाशी आहे, असे दिसते. स्वेच्छेने देहत्याग करणारे आजही अनेक सापडतात. अतिशय जीवलग माणसाचे मरण वा भयंकर घटना घडली, म्हणजे देहपात होणारेसुद्धा अनेक सापडतात. त्यांचे शरीर पूर्ण निरोगी असते; पण मानसिक आघातामुळे ते जगू शकत नाहीत. तेव्हा मरणाचे कारण केवळ शारीरिक असंतुलनातच असते, हे म्हणणे योग्य ठरणार नाही. इहजीवनात उत्तम संस्कार प्राप्त करून जी व्यक्ती देह ठेवते, ती मरणोत्तर पुनर्जन्माच्या वेळी उत्तम संस्कारामुळे उत्तम कुलात जन्मतःच ज्ञानी जीवन जगते. गीता सांगते, ‘शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभि जायते’ असे साधक मृत्युंजय नाहीत तर काय?
 
इच्छामरण वा देहपात
 
स्वेच्छेने मरण स्वीकारणार्‍यांच्या अनेक कथा अनेकांनी ऐकल्या असतील, कदाचित पाहिल्याही असतील. स्वेच्छेने मरण स्वीकारणार्‍यांच्या यादीत, सीमेवर लढणार्‍या सैनिकांपासून स्वातंत्र्य लढ्यातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, प्रायोपवेशन करणारे वीर सावरकर! याशिवाय, आपले मरण आगाऊ सांगून आपला देह स्वेच्छेने ठेवून, मृत्यूला कवटाळणार्‍या महान योग्यांपर्यंत सारेचजण असू शकतात. भगतसिंग आदी देशभक्तांना मृत्यू स्वीकारताना फाशीच्या दोराची आवश्यकता पडली, परंतु उच्च साधक वा भक्तांच्या स्वेच्छामरणाकरिता असल्या बाह्य उपकरणांची वा कारणांची आवश्यकता नसते. कोणत्याच प्रकारचा रोग वा दुर्घटना नसतानासुद्धा, मोठ्या आनंदाने देहत्याग करणारे महामानव आहेत.
 
वंगदेशातील महान कालीभक्त श्रीरामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांनी आपला मृत्यू अगोदरच सांगितला होता. पुरीच्या बाबाजींचे उदाहरण त्यांपैकीच एक आहे, ते पुढील लेखात अनुषंगाने येईलच. सर्व शरीर ठायी ठायी शरवेधाने आच्छादित असतानाही, शरपंजरावर पहुडलेल्या भीष्म पितामहांनी योग्य वेळ आल्यावरच आपला देह ठेवला, तर सर्व महाभारतीय युद्धात कोणत्याच प्रकारचा घाव न होऊ देणार्‍या भगवान श्रीकृष्णांनी, निर्वाणाच्या समयी एका साधारण व्याधाच्या पायाला लागणार्‍या बाणाचे कारण करून प्रभास क्षेत्री आपला देह त्वरित ठेवला. दोन उदाहरणे आहेत, पण दोन टोकांची!
 
समाधी घेण्यापूर्वी सर्व संतांना पूर्वीच कल्पना देऊन एका निश्चित दिवशी भीममुद्रा लावून सदेह समाधी घेणारे योगी ज्ञानेश्वर माऊली, आळंदीमध्ये 700 वर्षांपासून आजही योग्य साधकांना मार्गदर्शन करीत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत तर देहपात वा साधारणतः ज्याला मृत्यू समजतात, अशी घटना घडलीच नाही. मृत्युसुद्धा संजीवन समाधी आणि तीसुद्धा युगायुगांपर्यंत
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121