नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?
10-Apr-2025
Total Views | 40
नवी दिल्ली (Tahawwur Rana) : काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस नेता पी. चितंबरम यांनी याचे श्रेय हे काँग्रेसलाच दिले आहे.
पी. चिदंबरम म्हणाले की, २६/११ च्या आरोपीचे प्रत्यार्पण २००९ मध्ये सुरू झालेल्या राजकीय कूटनीति, कायदेशीर कार्यवाही आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे परिणाम आहेत. ते पुढे म्हणाले की, सध्याचे एनडीए सरकार प्रत्यार्पणाचे अवाजवी श्रेय घेत आहेत. २१ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.
Tahawwur Rana's extradition result of UPA-era groundwork: Chidambaram slams Modi govt for taking credit
ज्यावेळी हा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नेतृत्वात युपीए सरकार होती. दहशतवादी हल्ल्यातील या घटनेत तत्कालीन सरकारने पाकिस्तान विरोधात कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला होता. सांगण्यात येत आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नरेंद्र मोदींनी नुकतीच भेट घेतली होती. त्यावेळी त्या भेटीत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचे बोलले जात आहे.