प्राचीन भारतीय परंपरा आणि ग्रंथ वर्तमानात तितकेच समर्पक

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    01-Apr-2025   
Total Views | 8

Dr.Mohanji Bhagwat Nagpur

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sarsanghachalak at Vaidik Ganit Book Publishing)
"आधुनिक विज्ञान आणि पारंपारिक भारतीय ज्ञान यांचा समन्वय जागतिक कल्याणात अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आपल्या प्राचीन भारतीय परंपरा आणि ग्रंथ, ज्यात सखोल वैज्ञानिक आणि तात्विक समज आहे, आजच्या काळात ते तितकेच समर्पक आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. सोमवार, दि. १ एप्रिल रोजी नागपुर येथे आयोजित वैदिक गणित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, "'संपूर्ण जग आज भारताकडून समाधाची अपेक्षा करत आहे. भारताला जगाचे नेतृत्व करायचे असेल, तर त्याला आपले प्राचीन ज्ञान आणि परंपरा आधुनिक संदर्भात नव्याने तपासून आजच्या काळाशी जुळवून घ्याव्या लागतील. आपली प्राचीन ज्ञान प्रणाली जगाच्या पुनर्बांधणीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. भारत हे शतकानुशतके ज्ञान आणि समाधानाचे केंद्र आहे. आधुनिक जगात लोक अनेक आव्हानांना तोंड देत असताना भारतीय ज्ञान प्रणाली त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते.

पुढे ते म्हणाले, "आपल्या धर्मग्रंथांचे आणि परंपरांचे पुनर्परीक्षण करून आपल्या मूल्यांनुसार त्यांची पुनर्रचना केली पाहिजे, जेणेकरून ते देशाच्या विकासात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील. भारतीय ज्ञान हे केवळ अध्यात्मिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर त्यात गणित, विज्ञान, योग, वैद्यक आणि सामाजिक समरसतेशी संबंधित तत्त्वे आहेत, जी संपूर्ण मानवतेसाठी फायदेशीर ठरू शकतात."

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121