कल्याण : ( Unique initiative of Kalyan Fire Department ) आग लागल्यास कसा बचाव करावा, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कल्याण अग्निशमन दलाच्यावतीने कल्याण पश्चिमेतील शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोना काळात उभारण्यात आलेल्या कोविड कक्षामध्ये बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्र आता पालिकेच्या शाळेत बसविण्यात आली आहेत.
आग लागल्यास त्याचा वापर कसा करावा, कोणत्या परिस्थितीत कोणते यंत्र उपयोगात आणावे? याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना धूर भरलेल्या ठिकाणी कसा मार्ग काढायचा? आगीपासून स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवायचा, तसेच प्राथमिक अग्निशमन यंत्रणांचा वापर कसा करायचा? यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.