केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार जम्मू-काश्मीरचा दौरा

    01-Apr-2025
Total Views | 4
 
Union Home Minister Amit Shah to visit Jammu and Kashmir
 
नवी दिल्ली : ( Union Home Minister Amit Shah to visit Jammu and Kashmir ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील आठवड्यात जम्मू आणि काश्मीरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
 
या दौर्‍यात ते सुरक्षा कर्मचार्‍यांशी संवाद साधणार असल्याचे समजते.दौर्‍यामध्ये गृहमंत्री शाह कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. जम्मू आणि काश्मीर पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि गुप्तचर संस्थांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
 
दहशतवादविरोधी कारवाया, सीमापार घुसखोरीचे प्रयत्न आणि जम्मू आणि काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थिती यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.आढावा बैठकीव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री आंतरराष्ट्रीय सीमेवरील पुढील भागांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याची आणि तेथे तैनात असलेल्या दलांचे मनोबल वाढवण्याची अपेक्षा आहे.
 
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी वाढलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121