खोक्या भोसले प्रकरणात माझ्या खुनाचा कट! आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप; काय म्हणाले?

    01-Apr-2025
Total Views | 19
 
Suresh Dhas
 
बीड : खोक्या उर्फ सतीश भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
 
खोक्या भोसलेने हरणाची शिकार करून सुरेश धस यांना ते मांस पुरवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केला आहे. राजस्थानमधून बिश्नोई समाजातील काही लोकांना विमानाने मुंबईत आणले आणि माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
 
यामागे कोण आहे आणि हे सगळे षडयंत्र कुणी रचले याबाबतची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा कट कुणी रचला हे मला माहित असल्याचेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
 
सतीश भोसले याने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढए आली होती. बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला प्रयागराजमधून अटक केली. त्यानंतर आता सुरेश धस यांनी याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121