समाधीचे प्रकार आहेत. 1) सविकल्प समाधी आणि 2) निर्विकल्प समाधी. समाधी म्हणजे एका विशिष्ट ध्यानात्मक अवस्थेचे वर्णन आहे, जी ध्यान आणि आत्मसाधनेच्या प्रक्रियेतून प्राप्त होते. हे केवळ एका स्मारकाचे नाव नाही, तर ती एक आध्यात्मिक स्थिती आहे, जिथे व्यक्तीला स्वतःच्या अहंकारापासून आणि भौतिक जगापासून पूर्णपणे वेगळे होऊन एका उच्च स्तरावर जाण्याचा अनुभव येतो.
समाधीचे विविध अर्थ
ध्यान : समाधीचा संबंध ध्यान आणि एकाग्रतेसोबत आहे, जिथे व्यक्ती आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवतो.
आध्यात्मिक स्थिती : समाधी म्हणजे मनाची एक अशी अवस्था, जिथे व्यक्तीला शांती, आनंद आणि आत्म-ज्ञानाचा अनुभव मिळतो.
स्मारक : काही वेळा ‘समाधी’ हा शब्द थडगे किंवा स्मारकालादेखील सूचित करतो, जिथे एखाद्या व्यक्तीचे शरीर दफन केलेले असते किंवा त्याचे स्मरण केले जाते.
आध्यात्मिक विकास : समाधीच्या माध्यमातून व्यक्तीला आत्मसाधनेमध्ये मदत मिळते आणि त्याला आत्मज्ञानाकडे वाटचाल करता येते.
मोक्ष : काही धार्मिक परंपरांमध्ये समाधीला मोक्ष किंवा निर्वाण मिळवण्याची अंतिम पायरी मानले जाते.
ध्यान आणि योग : समाधी ही ध्यान आणि योगसाधनेत एक महत्त्वाची भूमिका बजावते.
संप्रज्ञात समाधी : या स्थितीत व्यक्तीला जाणीव असते आणि तो जागतिक परिस्थितीत काही प्रमाणात सहभागी असते.
असंप्रज्ञात समाधी : या स्थितीत व्यक्तीला जाणीव नसते, पण ती एका उच्च स्तरावर असते, जिथे तो जगापासून पूर्णपणे वेगळा असतो. त्यासाठी आध्यात्मिक धारणा हे दृश्य विश्व आहे, पण ते नश्वर आहे. त्यातूनच आनंद, उपभोग, सुख, दुःख प्राप्त होणारे आहे; पण तेही क्षणैक व नश्वर आहे. त्यासाठी कर्म करणे आलेच, पण त्या कर्माचे फळ मात्र नश्वर नाही, तर ते पुनश्च एकदा भोग किंवा उपभोग देणारे आहे. मग ते भोग किंवा उपभोग घेण्यासाठी हा जन्म नाही पुरला, तर पुढचा, असे हे जन्म-मृत्यूचे रहाट गाडगे कायम आहे; पण स्थिर नसून बदलते आहे. मग, स्थिर, अमर, शाश्वत, सनातन हे फक्त आत्मिक विश्व आहे, ते दिसत नाही; पण आहे. ते दाखवता येत नाही; अनुभवता येते, ध्यानाद्वारे, तेच आत्मिक ध्यान. तीच संप्रज्ञात समाधी होय.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्॥
भगवद्गीता अध्याय 9 श्लोक-27
अर्थ : हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. जसे भातुकलीच्या खेळात लहान मुले आनंद घेतात व खेळ संपला की तो मोडून टाकतात व खेळणी जेथून घेतली तिथे परत ठेवून देतात व त्यात गुंतून पडत नाहीत, तशी कर्मे करून ते करीत असताना परमेश्वराकरिता करीत आहे, या भावनेने करीत आनंद घेऊन ती त्याची त्याला परत करणे, म्हणजे ईश्वरप्रणिधान केल्याने त्यात आपण गुंतून पडत नाही. तीच जानीवशून्य स्थिती म्हणजेच असंप्रज्ञात समाधी.
येतुलेनि तें कर्म। सांडी जन्मभय विषम।
करूनि दे उगम। मोक्षसिद्धि॥
ज्ञानेश्वरी अध्याय 18 श्लोक-701॥
अर्थ : एवढ्याने ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालवते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते.
ऐसें करी तो भला। संसारभयें सांडिला।
करणीयत्वें आला। मुमुक्षुभागा॥
ज्ञानेश्वरी अध्याय 18 श्लोक-702॥
असे जो कर्म करतो, तो संसारभयाकडून चांगल्या रितीने सुटला जातो व त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षुच्या योग्यतेला आला.
तेथ जे बुद्धि ऐसा। बळिया बांधे भरंवसा।
मोक्षु ठेविला ऐसा। जोडेल येथ॥
ज्ञानेश्वरी अध्याय 18 श्लोक-703॥
त्या मुमुक्षुस्थितीत जी बुद्धी असा बळकट भरवसा बांधते की अशा रितीने केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल.
म्हणौनि निवृत्तीची मांडिली। सूनि प्रवृत्तितळीं।
इये कर्मीं बुडकुळी। द्यावीं कीं ना?॥
ज्ञानेश्वरी अध्याय 18 श्लोक-704॥
म्हणून ती बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे. अशा रितीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते, तरी आतून खरी निवृत्तीच आहे. अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच, अशा रितीने कर्म करण्याचा बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच.
तरी तयाच्या जीविता। नाहीं जेवीं अन्यथा।
तैसें कर्मीं इये वर्ततां। जोडेचि मोक्षु॥
ज्ञानेश्वरी अध्याय 18 श्लोक-707॥
तर तो जगेलच यात अन्यथा नाही, त्याप्रमाणे या निष्काम बुद्धीने केलेल्या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच. (क्रमशः)
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
9730014665